नाशिक : राज्यातील पोलिस दलातील ५०० उपनिरीक्षकांना सहायक पोलिस निरीक्षकपदी बढती दिली आहे. यामध्ये नाशिक परिक्षेत्रास एकूण १३ नवे सहायक निरीक्षक मिळाले असून शहर पोलिस दलातून सहा तर ग्रामीणमधून पाच उपनिरीक्षकांना पदोन्नतीने बदली देण्यात आली आहेत. (The sub-inspector was transferred by promotion)
पोलिस दलातील नि:शस्त्र सहायक पोलिस निरीक्षकांची रिक्त पदे मूळ सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्यात आली आहेत. त्यानुसार पात्र ठरलेल्या पोलिस उपनिरीक्षकांना पदोन्नती देऊन महसूलवर्गाचे वाटप करण्यात आले आहे. यानुसार नाशिक शहर पोलिस दलातील सुवर्णा महाजन यांनी गडचिरोलीमध्ये तर उद्धव हाके यांची छत्रपती संभाजीनगरला, दानिश मन्सुरी यांची कोकण परिक्षेत्रात, मंगेश गोळे यांची मुंबईत सहायक पोलिस निरिक्षक पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. तसेच नाशिक ग्रामीण पोलिस दलातील शशिकिरण नावकार, संजय कवडे यांची गडचिरोलीला, तर रूपाली महाजन यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.
सौरभ खंडाळे, अमोल पवार, ज्ञानेश्वर भडांगे, अशोक काटे, सचिन कवडे, विशाल पाटील, राहुल भंडारे, रामचंद्र शिखरे, राजेंद्र चाटे, प्रवीण सोनवणे, गणेश जाधव, नितीन गायकर, स्वप्नील शिंदे, नविता घुगे, धर्मराज पटले, मोनालिया मोरे, वर्षा पाटील, समाधान हिरे, भूषण सोनार, शंकर पवार, सोनिया इनामके.