देवळा ; पुढारी वृत्तसेवा– देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी वाजगाव येथील संजय दादासाहेब गायकवाड यांची तर व्हा. चेअरमन पदी अर्चना किरण आहेर यांची मंगळवारी (दि. २०) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
या संघाचे तत्कालीन चेअरमन कैलास देवरे, व्हा चेअरमन अमोल आहेर यांनी आवर्तन पध्दती नुसार राजीनामा दिल्याने ह्या रिक्त पदाच्या जागांसाठी आज मंगळवारी (दि. २०) रोजी दुपारी ११ वाजता संघाच्या कार्यालयात सहकार अधिकारी ज्ञानेश्वर आहिरे, वसंत गवळी यांच्या उपस्थितीत तत्कालीन चेअरमन कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली. यावेळी सर्वानुमते चेअरमन पदी वाजगाव येथील प्रगतिशील शेतकरी संजय गायकवाड यांची तर व्हा चेअरमन पदी अर्चना आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे सभापती व संघाचे संचालक योगेश आहेर, चिंतामण आहेर, डॉ. राजेंद्र ब्राह्मणकार, हंजराज जाधव, काशिनाथ पवार, नानाजी आहेर, रवींद्र जाधव, साहेबराव सोनजे, सुलभा आहेर, सुवर्णा देवरे, चेतन गुंजाळ, विनोद देवरे, सचिन सूर्यवंशी आदींसह सचिव गोरक्षनाथ आहेर उपस्थित होते. आभार अमोल आहेर यांनी मानले. नूतन पदाधिकाऱ्यांचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे
हेही वाचा :