नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासह कार्यकारिणी सदस्यांच्या १० पदांसाठी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत खेळाडू पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखले. पॅनलचे सर्व ११ उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले असून, अध्यक्षपदी धनपाल (विनोद) शाह सातव्यांदा निवडून आले आहेत.
शनिवारी (दि.३) गंगापूर रोडवरील अन्नपूर्णा सभागृहात चेअरमनपदासह कार्यकारिणी सदस्यांच्या १० पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी तीन हजार ११२ सभासदांसह ७६ क्लबमधून एक हजार ३७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात खेळाडू पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार विनोद शाह यांना एक हजार २४३ मते पडली तर, पराभूत उमेदवार महेश झुंजार आव्हाड यांना अवघी ६८ मते पडली. त्याचबरोबर १० कार्यकारिणी सदस्यांसाठी झालेल्या मतदानातही खेळाडू पॅनलच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या फरकांनी विजय नोंदविता आला. तर पराभूत उमेदवारांना जेमतेम मतांवर समाधान व्यक्त करावे लागले. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. मनीष लोणारी आणि असोसिएट्सने कामकाज बघितले. रविवारी (दि.४) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड जाहीर करण्यात येणार आहे.
अध्यक्ष - धनपाल (विनोद शाह (१२४३), कार्यकारिणी सदस्य - महेंद्र आहेर (१२२२), राघवेंद्र जोशी (१२११), हेतल पटेल (११६९), जगन्नाथ पिंपळे (११०३), शिवाजी उगले (१०६४), अनिरुद्ध भांडारकर (१२३३), निखिल टिपरी (११९७), विक्रांत मते (१२५५), बाळासाहेब मंडलिक (१२०५), नितीन धात्रक (१२२४).
अध्यक्ष - महेश आव्हाड (६८), कार्यकारिणी सदस्य - संदीप सेनभक्त (५६२), महेश भामरे (१९८), ज्ञानेंद्र सिसोदिया (१५२).
सचिव समीर रकटे, खजिनदार हेमंत देशपांडे, सहसचिव योगेश हिरे, तीन निवड समिती सदस्यांमध्ये सतीश गायकवाड, तरुण गुप्ता, फैयाज गंजीफ्रॉकवाला आदी.