नाशिक

Nashik News : घरकुलासाठी नांदगावला प्रहारचे झोपडी आंदोलन

गणेश सोनवणे

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; प्रधानमंत्री आवास योजना ड यादीमधील विशेष गरजू लाभार्थांना प्राधान्यक्रमाने घरकुल योजनेचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने नांदगाव पंचायत समितीसमोर झोपडी आंदोलन करण्यात आले. नांदगाव पंचायत समितीच्या आवारात प्रहारच्या वतीने सकाळपासून झोपड्या ठोकण्यात आल्या होत्या. (Nashik News)

ड यादीमध्ये पात्र लाभार्थ्यांमध्ये विशेष गरजू लाभार्थीदेखील आहेत. त्यांना इतर लाभार्थ्यांपेक्षा प्राधान्यक्रमाने घरकुल योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. ते कुटुंबासह उघड्यावर राहात असून, सर्वसाधारपणे ग्रा.पं. स्तरावरून पात्र लाभार्थ्यांच्या यादीची शिफारस केली जाते. परंतु ग्रामपंचायतीने कुठल्याही प्राधान्यक्रमाचा विचार न करता पात्र यादी सरसकट वरिष्ठ स्तरावर पाठविली जात असल्याने, विशेष गरजू लाभार्थी दीर्घकाळापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना ड यादीच्या दुसऱ्या टप्यामध्ये प्राध्यान्यकमाने घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अशा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या होत्या. गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी आंदोलकांची भेट घेत मागण्यांसंदर्भात लवकरच सक्रिय निर्णय घेणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.( Nashik News)

आंदोलनात प्रहार संघटनेचे चंद्रभान झाडगे, संदीप सूर्यवंशी, ईश्वर जाधव, किरण गवळी, गणेश चव्हाण, संतोष राठोड, काळीबाई चव्हाण, गोरख जगन्नाथ, धर्मा मोरे, किशोर राठोड, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT