बोगस तणनाशक Pudhari News Network
नाशिक

Nashik News | बोगस तणनाशकप्रकरणी नऊ कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून कारवाईचा बडगा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शेतकऱ्यांनी कांदा पिकावर आयपीएल व अनु प्रोडक्ट्स या कंपनीचे तणनाशक फवारल्याने जिल्ह्यातील १२८ शेतकऱ्यांचे २०५ एकरचे नुकसान झाले. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने यात, जिल्ह्यातील नऊ कृषी सेवा केंद्रांचा परवाने रद्द केले आहेत. यात देवळ्यातील दोन, सटाणा तीन, कळवण तीन व नाशिक तालुक्यांतील एका सेवा केंद्राचा समावेश आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून संबंधित कंपन्यांकडे प्रस्तावही दाखल केला आहे.

कांदा पिकातील तण मारण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधांची फवारणी करतात. त्यासाठी आयपीएल व अनु प्रोडक्ट्स या औषधांची फवारणी करण्यात आली होती. त्यामुळे कांद्याचे पीक जळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात कळवणमध्ये १८ शेतकऱ्यांचे २७.४२ एकरांचे नुकसान झाले. देवळ्यात ५५ शेतकऱ्यांचे ९८.१५ एकरांचे नुकसान झाले. बागलाणमध्येही दहा शेतकऱ्यांचे १८.३० एकरांचे नुकसान झाले. आयपीएलमुळे जिल्ह्यात ८३ शेतकऱ्यांचे १४३.८७ एकरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तर या तणनाशकामुळे ४५ शेतकऱ्यांचे ६१.०५ हेक्टरचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रचालकांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १२) कृषी सेवा केंद्रांची सुनावणी झाली. तसेच ज्या कृषी सेवा केंद्रचालकांना समाधानकारक उत्तर देता आले नाही, त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई कृषी उपसंचालकांनी केली आहे. यावेळी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

शासनाच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या कृषी विभागाच्या चौकशीत दोषी आढळलेल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द केला आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी संबंधित रासायनिक औषध कंपन्यांकडे मागणी केली असून, पत्र देण्यात आले आहे.
जगदीश पाटील, कृषी उपसंचालक, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT