Index fund file photo
नाशिक

Nashik News | गुंतवणूकदारांची इंडेक्स फंडात लक्षणीय वाढती लोकप्रियता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : कोरोनानंतर बाजारात सुरू झालेल्या तेजीच्या नव्या पर्वात रिटेल गुंतवणूकदारांचा इंडेक्स फंडाकडे (Index fund) प्रचंड ओढा वाढल्याचे ॲम्फीच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. इंडेक्स फंडात सर्वसामान्य गुंतवणूकदारांची (रिटेल) फोलिओची संख्या जवळपास बारा पटीने वाढली आहे. मार्च २०२० मध्ये फोलिओंची संख्या ४.९५ लाखांवरून डिसेंबर 2023 पर्यंत ५९.३७ लाखांपर्यंत वाढली आहे.

इंडेक्स फंडांच्या (Index fund) एकूण मालमत्ता व्यवस्थापन निधी (एयूएम)मध्ये गत चार वर्षांत आश्चर्यकारक वाढ झाली आहे. रिटेल गुंतवणूक मार्च 2020 मध्ये अंदाजे 8,000 कोटी रुपये होती. मार्च 2024 पर्यंत या फंडांकडील एकूण निधी तब्बल २५ पटीने वाढून सुमारे 2,13,500 कोटी रुपयांवर झेपावला. यातूनच इंडेक्स फंड आणि शेअरबाजाराने गुंतवणूकदारांवर किती मोहिनी घातली आहे, हे स्पष्ट होत आहे.

उल्लेखनीय म्हणजे, गुंतवणुकीसाठी अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डेट इंडेक्स फंडांनी मार्च 2021 पर्यंत नगण्य ते लक्षणीय अशी वाढ नोंदवली आहे. डेट फंडांनी मार्च 2024 मध्ये 1.1 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा टप्पा ओलांडला आहे. डेट इंडेक्स फंडांचा (Index fund) एकूण एयूएममधील वाटा 51.5 टक्के आहे. इक्विटी इंडेक्स फंडाचा वाटा सध्या 48.5 टक्के आहे. पण आगामी काळात इंडेक्स फंडांतच (Index fund) वाढ होताना दिसणार आहे. मार्च 2021 मध्ये ४४ टक्के वाढ दर्शविणाऱ्या इंडेक्स फंडाने मार्च २०२४ पर्यंत २०७ टक्के वाढ साध्य केली आहे. तीन वर्षांत इंडेक्स फंडाने एकूण ३७० टक्के वाढ नोंदविली आहे.

म्युच्युअल फंड (Mutual fund) उद्योगातील फोलिओत इंडेक्स फंडांचे योगदान अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षात जवळपास 11 टक्के नवीन फोलिओ इंडेक्स फंडाचे आहेत. शेअरबाजाराकडे सर्वसामान्य गुंतवणूकदार वळत असल्याच्या प्रवाहाची ही सुरुवात आहे. रिटेल गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये इंडेक्स फंडासारख्या अप्रत्यक्ष माध्यमातून शेअरबाजारात उडी घेत आहे. ॲम्फीच्या आकडेवारीनुसार, निफ्टी फिफ्टी निर्देशांकातील एकूण एयूएमपैकी 70.7 टक्के म्हणजेच 52 हजार कोटी रुपये हे लार्ज-कॅप समभागांचे आहे. त्यानंतरच्या निफ्टी नेक्स्ट फिफ्टीत 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली असून, एकूण गुंतवणुकीत त्यांचा वाटा 14.6 टक्के आहे. जून 2024 पर्यंत, निर्देशांकातील म्हणजेड इंडेक्स फंडातील (Index fund) निधी 2.43 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने ९०० टक्के वाढ दर्शवली आहे. ही वाढ किरकोळ गुंतवणूकदारांमधील इंडेक्स फंडांच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ दर्शवते.

इंडेक्स फंड म्हणजे काय

इंडेक्स फंड (Index fund) हा पॅसिव्ह म्हणजेच अप्रत्यक्ष गुंतवणुकीचा प्रकार होय. थेट शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचे धाडस टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा सुरक्षित गुंतवणूक प्रकार आहे. या फंडात जमा झालेला निधी फंड व्यवस्थापक निफ्टी फिफ्टीसारख्या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या समभागांमध्ये करत गुंतवणूकदारांना परतावा मिळून देतो.

बडोदा बीएनपी पारिबाची जोरदार इनिंग

बडोदा बीएनपी परिबा लार्ज कॅप फंड या सप्टेंबरमध्ये महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडत आहे. हा फंड गुंतवणूकदारांसाठी सातत्याने संपत्ती निर्माण करण्याची आपली २० वर्षे पूर्ण करत आहे. हा फंड सुरू झाल्यापासून सातत्याने मासिक १० हजार रुपये गुंतवणुकीमुळे आज यामधील गुंतवणूकदार करोडपती होत त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य १.२८ कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. स्थापनेपासूनच बडोदा बीएनपी पारिबा लार्ज कॅप फंडने १ वर्ष, ३ वर्षे, ५ वर्षे व १० वर्षांच्या कालावधीत आणि त्याच्या स्थापनेपासून सातत्याने निर्देशांकाहून सरस कामगिरी केली आहे. गुंतवणूकदारांना या फंडाच्या कमी अस्थिरतेचा फायदा झालेला आहे. या फंडाची अस्थिरता ही एकूण बाजाराच्या तुलनेत बीटा वनपेक्षा कमी आहे. हे वैशिष्ट्य बाजारातील मंदीच्या काळात स्थिरता प्रदान करते आणि शाश्वत दीर्घकालीन परतावाही मिळवून देतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT