Nashik news  
नाशिक

Nashik news | गो शाळेच्या नावाखाली शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण हटवले

पुढारी वृत्तसेवा

देवळा : कनकापूर येथील ग्रामपंचायतीच्या गट नं १७४ मध्ये शासकीय जागेवर अनधिकृत गो शाळेचे बांधकाम केले आहे. सदर अनधिकृत बांधकाम ग्रामपंचायतीने (दि ३१) रोजी पोलीस बंदोबस्तात नेस्तनाबूत केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कणकापूर कांचने शिवारात भाऊसाहेब शिंदे यांनी गो शाळा उभारली आहे. या गो शाळेलगत अनधिकृत खोल्यांचे बांधकाम सुरू करण्यात आल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. यातील जनावरांमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. याच गटात शिंदे यांनी अनधिकृत खोलीचे बांधकाम सुरू केले होते. ग्रामपंचायतीने त्यांना (दि. ९) जानेवारी रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम क्र. 3 च्या कलम 53(अ) अन्वये अतिक्रमण काढून घेणे संदर्भात नोटीस बजावली होती. यात अतिक्रमण थांबवनेबाबत सूचित करण्यात आले असताना देखील संबंधिताने अतिक्रमण सुरूच ठेवले तसेच नोटीस दिल्या पासून ७ दिवसाची मुदत ग्रामपंचायती ने दिली होती अन्यथा ग्रामपंचायत मार्फत अतिक्रमण काढून घेण्यात येईल व त्या बद्दलचा खर्च वसूल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता .परंतु त्यावर कुठलेही लेखी खुलासा सादर करण्यात आआलं नाही .त्यामुळे ग्रामपंचायती मार्फत हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात आले .यावेळी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

यापूर्वी ग्रामपंचायती मार्फत वेळोवेळी नोटीस बजावण्यात आल्या आहेत व शासकीय जमिनीवर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये अशी समज देण्यात आली असतांना देखील याठिकाणी विनापरवाना जाणीवपूर्वक अतिक्रमण केले गेले .

यकामाला गावातील सर्व ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्यामुळे ग्रामपंचायतीने हा तातडीचा निर्णय घेऊन कार्यवाही केली असून ,ग्रामस्थानी सदर गो शाळेची महाराष्ट्र गो सेवा आयोगाकडून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे .

यापुढे ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्याना नक्कीच चाप बसणार असून ,यापुढे शासकीय जागा मोकळ्या होऊन विकास कामे करण्यासाठी या जागांचा उपयोग होईल असे सरपंच बारकु वाघ यांनी सांगितले .

यावेळी पोलिस पाटील दौलत जैन, तंटामुक्ती अध्यक्ष रवी बर्वे, सरपंच बारकु वाघ, उपसरपंच जगदीश शिंदे, सदस्य किरण गांगुर्डे, बीजला बर्डे, जिजाबाई मोरे, सुशीला पवार, पांडुरंग पिंपसळे, बिबाबाई बचाव, ग्रामसेवक सरिता मिस्तरी, गाव समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष अड तुषार शिंदे, सचिव योगेश शिंदे, सदस्य विलास जैन, बापू सावकार, खंडेराव शिंदे, नितीन जिभाऊ शिंदे, सुनील शिंदे, काकाजी शिंदे, महेंद्र देवरे, सागर शिंदे, पपू शिंदे, निलेश शिंदे, गणेश शिंदे, रंजना मोरे, अल्का भवरे, रंजना बर्डे, संगीता मोरे, ताराबाई वाघ आदी व ज्येष्ठ नागरिक धनाजी शिंदे, श्रीराम शिंदे, धोंडीराम शिंदे, लक्ष्मण शिंदे, माणिक शिंदे, भाऊसाहेब शिंदे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .

@ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वत:च्या मालकीची कुठेही गोशाळा नाही. संघ कुठल्याही शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्याचे समर्थन करत नाही.

. बापु शिंदे,जिल्हा सहकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

@ गायरान जागेवर गो शाळा असून,आपण गो शाळेतील गायींचे पालन पोषण करतो .याठिकाणी पडीत जागेवर गायीच्या संरक्षनासाठी खोल्यांचे बांधकाम सुरू केले होते .हे अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी ग्रामपंचायती कडे आठ दिवसांची परवानगी मागितली होती .यामुळे आमचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे . याची भरपाई मिळावी अशी मागणी करणार आहेत .तसेच गावात अनेक ठिकाणी शासकीय जागेवर अतिक्रमणे केली आहेत .ते पण काढण्यात यावी .

भाऊसाहेब शिंदे ,गो शाळा मालक ,कणकापूर

फोटो ओळ ; कणकापूर ता देवळा येथे गो शाळेच्या आवारात अनधिकृत पणे बांधण्यात येत असलेले काम जेसीबीच्या सहाय्याने पाडताना दुसऱ्या छायाचित्रात पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, सरपंच बारकू वाघ, ग्रामपंचायत अधिकारी सरिता मिस्तरी आदिंसह ग्रामस्थ आदी (छाया ; सोमनाथ जगताप)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT