दिंडोरी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झालेले वडापावचे दुकान. (छाया: समाधान पाटील)
नाशिक

Nashik News | दिंडोरीत शॉर्टसर्किटने आग; लाखो रुपयांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील समर्थ वडापाव या दुकानाला पहाटे चारच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातीन फ्रीज, भट्टी, कोल्ड्रिंक्स आदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तसेच शेजारील रामेश्वर मिसळ, आदर्श सलुन या दुकानांनाही आगीची झळ बसल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे.

या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीची माहिती मिळताच दिंडोरी नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे.

दिंडोरीत अग्निशामक दलाची गाडी नसल्याने नाशिक किंवा पिंपळगाव बसवंत येथून अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करावे लागत होते. त्यामुळे आगीमुळे मोठे नुकसान होत होते. आता दिंडोरी नगरपचायतीत अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध झाल्याने आगीच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे.
महेंद्र गायकवाड, व्यावसायिक, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT