रेशन दुकान  file photo
नाशिक

Nashik News | रेशन दुकानदारांकडून 68.47 लाखांचा दंड वसूल

पुढारी विशेष ! यात 40 हजार 427 दक्षता समित्यांच्या माध्यमातून कारवाई; 51,691 तपासण्या

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिलीप सूर्यवंशी

राज्यात २0२४- २५ मध्ये दक्षता समित्यांमार्फत ऑक्टोबरपर्यंत ५१,६9१ निरीक्षणे घेण्यात आली. निरीक्षणादरम्यान रेशन दुकानदारांकडून ६8.४७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. ३9 रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले, तर ६9 रास्त भाव दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणाच्या संनिरीक्षणासाठी राज्यात विविध स्तरावर दक्षता समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचा नियमित पुरवठा व गुणवत्तेची खात्री करण्यासाठी अन गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी रास्त भाव दुकानांची निरीक्षणे घेणे ही जबाबदारी दक्षता समित्यांची आहे. राज्यात दक्षिता समित्यांची संख्या ४0 हजार ४२७ इतकी आहे. यात महानगरपालिका क्षेत्रात १0१, नगरपालिका ३00, जिल्ह्यात ३४, तालुकास्तरावर ४५५, गावांमध्ये ३9,५३७ इतकी आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील देखरेखीत जनतेचा सहभाग राहण्याच्या दृष्टीने शासन निर्णय दि. २३ जानेवारी, २008 अन्वये राज्यात ग्राम, तालुका, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हास्तरावर दक्षता समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ३0 ऑगस्ट २008 च्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. यात ग्राम, तालुका, जिल्हा, महानगरपालिका व नगरपालिका स्तरीय समित्यांची रचना करण्यात येते.

दक्षता समिती आणि बैठकांची सध्यस्थिती

ग्रामस्तर : ग्रामस्तरावरील दक्षता समितीचे अध्यक्ष हे त्या गावाचे सरपंच असतात. ग्रामपातळीवरील दक्षता समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय असे १३ सदस्य असतात.

तालुकास्तर : तालुका स्तरावरील दक्षता समितीचे अध्यक्ष हे त्या तालुक्याच्या जास्तीत जास्त भागाचे प्रतिनिधित्व करणारे विधानसभा सदस्य असतात. तालुका स्तरावरील दक्षता समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय असे १७ सदस्य असतात.

नगरपालिकास्तर : नगरपालिका स्तरावरील दक्षता समितीचे अध्यक्ष हे नगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त वॉर्डांचे प्रतिनिधित्व करणारे विधानसभा सदस्य असतात. नगरपालिका स्तरावरील दक्षता समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय असे १५ सदस्य असतात.

जिल्हास्तर : जिल्हा स्तरावरील दक्षता समितीचे अध्यक्ष हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. जिल्हा स्तरावरील दक्षता समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय असे २१ सदस्य असतात.

महानगरपालिकास्तर : महानगरपालिका स्तरावरील दक्षता समितीचे अध्यक्ष हे त्या शिधावाटप क्षेत्रातील विधानसभा सदस्य असतात. महानगरपालिका स्तरावरील दक्षता समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय असे २१ सदस्य असतात. वरील सर्व समित्यांवरील अशासकीय सदस्यांपैकी ५0 टक्के सदस्य या महिला असतात.

स्तर दक्षता समित्या- (संख्या)

  • महानगरपालिका- १0१

  • नगरपालिका- ३00

  • जिल्हा- ३४

  • तालुका- ४५५

  • गाव- ३9,५३७

  • एकूण- ४0,४२७

शासन आदेशान्वये, दक्षता समित्यांच्या बैठका नियमित आयोजित न केल्यास, सर्व स्तरावरील दक्षता समित्यांच्या सदस्य सचिवांविरुद्ध कर्तव्यपूर्ती न केल्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक), नियम, १9७9 चे उल्लंघन केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व याबाबतची कार्यवाही संबंधित जिल्हाधिका-यांनी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दक्षता समित्यांच्या बैठका नियमित आयोजित केल्या जातात किंवा कसे, या बाबीवर संबंधित अपर जिल्हाधिकारी आणि नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी स्वत: जातीने लक्ष देऊन त्याबाबतचा अहवाल सचिवांना प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत सादर करण्याबाबत सूचना आहेत.

शासन परिपत्रक १8 फेब्रुवारी, २0१३ अन्वये जिल्हा व तालुका स्तरावरील दक्षता समितीच्या बैठका प्रत्येक महिन्याच्या लोकशाहीदिनी घेण्यात याव्यात, अशा बैठकांची माहिती जनतेला व्हावी यासाठी त्याबाबत प्रसिद्धी देण्यात यावी, जनतेकडून पुरवठा विभागाच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या तक्रारींवर या बैठकांमध्ये चर्चा करण्यात यावी व प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात यावे, अशा सूचनाही शासनस्तरावर देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT