नाशिक : जिल्ह्यातील 38 लाख 68 हजार २६९ शिधापत्रिकाधारकांपैकी 30 लाख ८७ हजार ७४० नागरिकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून, अद्यापही 7.80 लाख लाभार्थी यापासून अलिप्त आहेत. दरम्यान, जिल्ह्यात 'नाशिक एफडीओ'ने ८१ टक्क्यांसह आघाडी घेतली आहे, तर कळवण नीचांकी पातळीवर आहे. येथे ७३.९६ टक्के केवायसी झाली आहे.
रास्त भावात धान्य मिळवण्यासाठी शासनाकडून ई - केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत होती. रेशन दुकानदारांना दोन वेळा नोटिसा बजावण्यात आल्यानंतर कामाला काहीशी गती मिळाली. मात्र, मुदत १०० टक्के काम होऊ शकलेले नाही.
दि. 30 एप्रिलपर्यंत ८० टक्के ई - केवासयी पूर्ण झाली आहे. 20 टक्के काम अद्यापही शिल्लक आहे. यापूर्वी चार वेळा मुदतवाढ दिली गेली. केवायसी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही होईल.कैलास पवार, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक
मालेगाव एफडीओ- 77,167, कळवण - 43,191, सुरगाणा - 34,892, चांदवड - 43,280, इगतपुरी - 42,081, पेठ - 26,522, दिंडोरी - 55,210, बागलाण - 62,481, नांदगाव - 40,649, सिन्नर - 46,134, त्र्यंबकेश्वर - 24,565, नाशिक - 57,680, निफाड - 64,656, मालेगाव - 53,903, देवळा - 19,398, येवला - 30,053, नाशिक एफडीओ - 58,667 (एकूण - 7,80,529)