मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खाजगी सचिवपदावर कार्यरत असलेले डॉ. रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
डॉ. गाडे हे सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत असून ते प्रतिनियुक्तीवर खाजगी सचिव या पदावर काम पाहत होते. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ (म.पु.) पासून त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे प्रत्यावर्तित करण्यात आली आहे.
या संदर्भातील आवश्यक आदेश तातडीने निर्गमित करावेत, असे निर्देश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांना पत्राद्वारे दिले आहेत.