Nashik District Government and Parishad Employees Cooperative Bank
नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक file photo
नाशिक

Nashik News | जिल्हा सरकारी बँकेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (दि.७) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होत आहे. बँकेला २०२३ -२४ या आर्थिक वर्षात सर्व तरतुदीवजा जाता निव्वळ नफा २.१५ कोटींचा झाला असून, संचालक मंडळाने यंदा सहा टक्के दराने लाभांश देण्याबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेवर शिफारस केली आहे.

  • जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

  • २०२३ -२४ या आर्थिक वर्षात सर्व तरतुदीवजा जाता निव्वळ नफा २.१५ कोटींचा

बँकेची आर्थिक स्थिती चांगली असून, भागभांडवल २२ कोटी २४ लाख, राखीव व इतर निधी २७ कोटी सहा लाख, एकूण ठेवी ३४८ कोटी ५५ लाख, कर्जवाटप २५२ कोटी ६४ लाख, एकूण गुंतवणूक २३ कोटी ९६ लाख इतकी केली असून, बँकेला ऑडिट वर्ग 'अ' प्राप्त झाला आहे. बँकेचा 'सीआरएआर' १४ टक्के असून, ढोबळ नफा ३.५४ टक्के, तर निव्वळ नफा १.७७ टक्के इतका असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे-पाटील यांनी दिली.

उपस्थितीचे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष महेश मुळे, संचालक प्रमोद निरगुडे, नीलेश देशमुख, अजित आव्हाड, मंदाकिनी पवार, सुनील गिते, धनश्री कापडणीस, रवींद्र आंधळे, रवींद्र बाविस्कर, मोहन गांगुर्डे, ज्ञानेश्वर माळोदे, जयंत शिंदे, विजय देवरे, रमेश बोडके, अभिजित घोडेराव, सचिन विंचूरकर, विक्रम पिंगळे, अमोल बागूल, विनोद जवागे व भरत राठोड यांनी केले आहे.

सभासद कन्येच्या सन्मानार्थ विवाह भेट म्हणून ११ हजार रुपये रक्कम बँकेत ठेवून ठेव पावती भेट देण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. त्यासाठी यंदाच्या नफ्यातून ११ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात ही रक्कम वाढवायची, कमी करावयाची किंवा कसे, याबाबत त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असा संचालक मंडळाचा मानस आहे.
बाळासाहेब ठाकरे- पाटील, अध्यक्ष, जि. प. कर्मचारी बँक
SCROLL FOR NEXT