भुजबळांच्या बालेकिल्ल्यातील चौकाचे 'मनोज जरांगे-पाटील' नामकरण
भुजबळांच्या बालेकिल्ल्यातील चौकाचे 'मनोज जरांगे-पाटील' नामकरण Pudhari Photo
नाशिक

Nashik News | भुजबळांच्या बालेकिल्ल्यातील चौकाचे 'मनोज जरांगे-पाटील' नामकरण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी नाशिकमध्ये येत मंत्री छगन भुजबळ यांना आव्हान दिल्यानंतर, मराठा समन्वयकांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यातील एका चौकाचे थेट 'मनोज जरांगे-पाटील' असे नामकरण केल्याने मराठा विरुद्ध भुजबळ वाद पेटण्याची शक्यता आहे.

लासलगाव-येवला विधानसभा मतदारसंघातील खेडलेझुंगे गावातील सोमठाणे त्रिफुलीवरील मुख्य चौकाचे मनोज जरांगे-पाटील असे नामकरण करताना याठिकाणी समन्वयकांकडून फलक उभारण्यात आले आहे. या चौकाला जरांगे-पाटील यांचे नाव देण्याबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे एकमत होवून सर्वानुमते याबाबतचा ठराव करण्यात आल्यानंतर रविवारी (दि. १८) याबाबतचा फलक उभारण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सन्मवयक करण गायकर, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, प्रवीण कदम, सरपंच शांताराम जाधव,सरपंच गोपीनाथ ठूबे, शिवाजीराजे मोरे, डॉ. सुजित गुंजाळ, डॉ. विकास चांदर-पाटील, समन्वयक नवनाथ शिंदे, किरण डोखे आदी उपस्थित होते. यावेळी फलकास नारळ वाढवून आणि फित कापत फटक्यांच्या आतषबाजीत उद्धघाटन करण्यात आले. 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमासाठी चांदोरी, लासलगाव, विंचूर, निफाड भागातील मराठा नेते, समन्वयक उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT