नााशिक : नील कुलकर्णी
हे कसले पक्षी टॉवर? हा तर सिमेंटक्रॉकिंटचा निरुपयोगी मनोरेच! माणसांप्रमाणे वसाहती करुन अथवा एका भव्य टॉवरमध्ये जवळजवळ राहायला पक्षी माणसे आहेत का? असा सवाल उपस्थित करत पक्षीतज्ज्ञ आणि पर्यावरण प्रेमी महापालिकेने पक्षांच्या निवाराऱ्यासाठी बांधलेल्या पक्षीघरांवर टिका करत आहेत. त्यामुळे अजब डोक लढवून महापालिकेने तयार केलेले पक्षीघर खरोखरच अशास्त्रोक्त, अभ्यासहिन प्रकल्पाचा नमुना ठरल्याची भावना जनसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
तीन वर्षांपूर्वी मनपाने पंचवटीतील पुरिया पार्क वाहतूक बेटावर 'पक्षी घर' या संकल्पनेचा शोध लाऊन रंगीबेरंगी १२ फूट उंच सिमेंटचा टॉवर उभारला. त्यानंतर असाचा मनोरा नवीन नाशिकमधील राणे नगरच्या रणगाडा वाहतूक बेटांवरही उभारला. टॉवरमधील रंगीत खोबण्यात पक्षी येतील आणि त्यामुळे पक्षांची वर्दळ वाढेल आणि या चिमण्या जिवांची किलबिल ऐकायला येईल असा मनपाचा उद्देश होता. यासाठी लक्षावधींचा निधी खर्च करण्यात आली. मात्र, यासाठी पक्षी तज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासकांचा सल्लाही घेतला नाही. आता या मनोऱ्यात तीन वर्षांनंतरही एकही पक्षांचा अधिवास नाही. कारण पक्षी अशा पद्धतीने कधीच मानवनिर्मित घरट्यात राहत बांधत नाहीत. कबुतरे वगळता येथे एकही पक्षी फिरकत नाही. कबुतरांना उंच जागी बसण्यास आवडते. त्यासाठी ते मनाेऱ्यात निवाऱ्यासाठी नव्हे तर केवळ बसण्यासाठी येतात. त्यातून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो असे पक्षीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर हजारो वाहने तसेच माणसांची वर्दळीच्या ठिकाणी पक्षी घर बांधतील हा मनपाचा जावई शोध असल्याची उपहासात्मक टिकाही यामुळे होत आहे.
माणसांप्रमाणे पक्षी एकाच ठिकाणी तेही मानवनिर्मित टॉवरमध्ये घरटे करत नाहीत. अभ्यास न करता दुसऱ्या राज्याने केले म्हणून केलेला प्रकल्प चुकीचा आहे. आठ- दहा लाख रुपयांत चौकात वृक्ष लावून त्याचे संवर्धन करता आले असते किंव्हा चिमण्याची कृत्रिम घरटी नागरिकांना वाटायला हवी होती. या प्रकल्पासाठी पक्षी आणि पर्यावरण तज्ज्ञांना विचाले नव्हते.शेखर गायकवाड, पर्यावरण अभ्यासक, नाशिक.
पक्षी टॉवरचे ठिकण व झालेला खर्च
पुरीयॉ पार्क, निमाणी बस स्थानक चौक (खर्च ८.५ लाख)
राणे नगर रणगाडा वाहतुक बेट चाैकी (१३,५ लाख)
हिरावाडी येथे खाजगी उद्योजकाने बांधलला टॉवर.
पक्षी टॉवरवर उधळलेला पैसा शहरातील इतर विकास कामांसाठी वापराला असता तर उपयुक्त ठरला असता, हे रंगीत पक्षीघर म्हणजे जनतेने पक्षाचा चुराडाच आहे. त्यापेक्षा शहरातील रस्ते, ड्रेनेज कचरा आदी गोष्टीत लक्ष घालून त्यात सुधारणा कराव्यात.सुधाकर पाटील, नागरिक पुरियॅा पार्क, पंचवटी, नाशिक.
पक्षी माणसांप्रमाणे एकाच सिंमेट टॉवरमध्ये घर करून राहत नाहीत. प्रत्येक पक्ष्यांची घरटे करण्याची रचना वेगवेगळी आणि निसर्गपूरक असते. पोपट, धनेश, सांळुकीसह कुठलेही पक्षी अशा टॉवरमधील खोबणीत घरटे करून राहत नाहीत. चिमण्याही वळचणीच्या जागी घरटी बांधून विणीच्या हंगामात घरटी करतात. कबुतरखान्यातील कबुतरेही खुराडेवजा खोबणीत राहतात. येथे बसण्यास येणारे कबुतरे येथे घर करत नाहीत. यामुळे नागरिकांना फुस्फुसाचे आजार देत आहेत असे मत पक्षीतज्ञ व अभ्यासकांनी नोंदवला आहे.