सिडको : चार चाकी वाहनावर पडलेला गुलमोहरचा वृक्ष. (छाया : राजेंद्र शेळके)
नाशिक

Nashik News | उपेंद्रनगर भागातून नुकतीच स्कूल व्हॅन गेली अन् चारचाकीवर गुलमोहर कोसळला

पुढारी वृत्तसेवा

सिडको : प्रभाग क्रमांक २८ मधील उपेंद्रनगर भागात गुलमोहरचा वृक्ष अचानक चार चाकी वाहनावर कोसळल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान काही सेकंदापूर्वी येथून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल व्हॅन गेली व्हॅन येथून गेल्यानंतर वृक्ष कोसळला आहे. त्यामुळे मोठी संभाव्य दुर्घटना टळली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवार (दि.९) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उपेंद्र नगर परिसरातील असलेल्या रिंकी संकुल येथे एका भला मोठा गुलमोहरचा वृक्ष अचानक कोसळला. यामध्ये विजय आहेर यांच्या मालकीच्या टेम्पोचे (क्र. एम एच १५ जे सी ८६४६) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आहेर यांनी दोन महिन्यापूर्वीच हा टेम्पो खरेदी केला होता. टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांच्यासमोर रोजगारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आबा पवार यांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत इलेक्ट्रिक कटरच्या साह्याने वृक्षाच्या फांद्या कट करून वृक्ष बाजूला करत वाहनधारकांना रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT