Nashik News
शेतकरी अनुदान अफरातफर प्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा दाखल  file photo
नाशिक

Nashik News | शेतकरी अनुदान अफरातफर प्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नांदगाव : शेतकऱ्यांच्या गारपीट अनुदानाची अफरातफर केल्याप्रकरणी मांडवड येथील ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तू चव्हाण यांच्यावरती नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गारपिटीचे अनुदानाचा अपहार झाल्या बद्दल मांडवड येथील शेतकरी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी समिती स्थापन करत या संदर्भात चौकशीच्या आदेश दिले होते. चौकशी अहवाल आल्यानंतर, संबंधित ग्रामसेवकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • गारपिटीचे अनुदानाचा अपहार झाल्याबद्दल मांडवड येथे ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते.

  • तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी समिती स्थापन करत या संदर्भात चौकशीच्या आदेश दिले होते.

  • चौकशी अहवाल आल्यानंतर, संबंधित ग्रामसेवकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठीचे अनुदान स्वतःच्या बॅंक खात्यावर केले वर्ग

मूळ शेतकरी खातेदार यांना डावलून, संगनमताने शेतकरी खातेदार यांना दिली जाणारी नुकसान भरपाई दिली जाणारी रक्कम, मूळ लाभार्थी यांचे यादीमध्ये त्यांचे आधार कार्ड व बँक खाते क्रमांक न देता स्वतः चे बँक खाते क्रमांक व आधार कार्ड वापरून स्वतःचे नावाने बँक खात्यात वर्ग करून तीन लाख सत्तावन्न हजार सातशे पन्नास रुपयांचा शासकीय अपहार केल्या प्रकरणी पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीईओंकडे बडतर्फीचा प्रस्ताव

या गुन्ह्याची दखल घेत गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी अपहार केलेल्या ग्राम विकास अधिकाऱ्या विरोधात बडतर्फीचा कारवाई करावी असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अशा प्रकारचा गुन्हा व बडतर्फीची कारवाई चा प्रस्ताव पाठविण्याचा तालुक्यातील पहिलीच घटना आहे. ग्राम विकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्यासह संगणक परिचालकासह अन्य बारा जणांविरोधात मंडळ अधिकारी सुवर्णा गोडे यांनी फिर्याद दाखल केली.

SCROLL FOR NEXT