विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे  pudhari file photo
नाशिक

Nashik Politics| माजी आमदार दराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात तोतयागिरी व राष्ट्रीय चिन्हाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दराडे यांचा आमदारकीचा कालावधी गेल्या जून महिन्यातच संपला आहे. तरीदेखील त्यांनी आमदार असल्याचे भासवून शासकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंबादास जगन्नाथ खैरे (रा. छत्रपती संभाजीनगर नाका, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, माजी आमदार नरेंद्र दराडे यांचा विधान परिषदेच्या आमदारकीचा कालावधी २१ जून २०२४ रोजी संपला आहे. दराडे यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या पत्रात दराडे यांनी विद्यमान आमदार असल्याचे भासविले आहे. पत्रावर स्वत:च्या नावासमोर सदस्य, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य असा शिक्का आणि त्यावर सही देखील केली आहे. तसेच या पत्रावर विधान भवनाचे प्रतिक व मध्यभागी राष्ट्रीय चिन्ह वापरले आहे. हे चिन्ह व मजकूर सर्वसामान्य नागरिकास वापरता येत नसतानाही दराडे यांनी तसे केल्याचे खैरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात दराडेंविरोधात भारताचे राज्य चित्राचा अयोग्य उपयोग प्रतिबंध २००५ नुसार गुन्हा दाखल करण्यता आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT