क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८१.७७ टक्के मतदान झाले (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik News | केव्हीएन नाईक शिक्षण संस्था निवडणूकीत ८१ टक्के मतदान

K.V.N.Naik Sanstha Election | गत पंचवार्षिकच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८१.७७ टक्के मतदान झाले आहे. एकूण ८४१७ सभासदांपैकी ६८८३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये ७९ टक्के मतदान झाले होते. तेव्हा संस्थेच्या ८ हजार ६९४ सदस्यांपैकी ६ हजार ८४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा मात्र २ टक्क्याने वाढ झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय मंडळाचे अध्यक्ष ॲड. जालिंदर ताडगे यांनी दिली आहे.

केव्हीएन नाईक संस्थेच्या संचालक मंडळाच्या २९ जागांसाठी निवडणूकीची मतदान प्रक्रीया संस्थेच्या आवारात पार पडली. संस्थेच्या आवारात तालुकानिहाय केंद्र तयार करण्यात आले होते. या ठिकाणी ६ हजार ८८३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान येवला-मालेगाव येथील सभासदांनी केले आहे. येवला मालेगावच्या ६४७ सभासदांपैकी ५९५ सभासदांनी, दिंडोरी-पेठ-सुरगाणा येथील ५७९ सभासदांपैकी ५२२ सभासदांनी, निफाड-चांदवड येथील १ हजार ९७० पैकी १ हजार ७१४ सभासदांनी, नांदगाव-सटाणा-कळवण येथील ८९४ पैकी ७६१ सभासदांनी, सिन्नर येथील १ हजार ७९० पैकी १ हजार ४६२ सभासदांनी, नाशिक तालुकासह इगतपुरी, मुंबईसह संगमनेर चाळिसगाव २ हजार ५३७ पैकी १ हजार ८२९ मतदास सभासदांनी मतदान केले आहे.

असे झाले मतदान..

  • सिन्नर : ८१.६८ टक्के

  • निफाड,चांदवड : ८७.०१ टक्के

  • नांदगाव, सटाणा व कळवण : ८५.१२ टक्के

  • येवला व मालेगाव : ९१.९६ टक्के

  • दिंडोरी, पेठ व सुरगाणा : ९०.१६ टक्के

  • नाशिक तालुका, शहरसह इगतपुरी, मुंबई, चाळिसगाव व संगमनेर : ७२.०९ टक्के

  • एकूण : ८१.७७ टक्के

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT