नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी 275 कोटींच्या विकास आराखडयाला मंजूरी देण्यात आली. अहिल्यानगर जिल्हयातील चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी मिळाल्याने त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे.
सिंहस्थ कुंभमेळयांच्या तोंडावर आल्याने कामांना गती द्यावी या दृष्टीने प्रशासनाने सातत्याने विविध विकास कामांचे आराखडे तयार करून शासनाला सादर केले आहे. एप्रिल महिन्यात त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला 'अ' वर्ग दर्जा देण्यात आला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नगरपरिषदेच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार केला.
त्र्यंबकेश्वरसाठी प्रत्यक्षात 1100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. प्रधान सचिवांच्या बैठकीमध्ये त्यातील काही विकास कामांना तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार सुमारे 300 कोटी रुपयांची विकास कामे तीर्थक्षेत्र विकास कामांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानूसार 300 कोटींचा आराखडा चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्यात आला. मंत्रिमंडळाने या आराखडयाला मंजूरी दिल्याने त्र्यंबक तीर्थाक्षेत्राच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
दर्शनपथांचे सुशोभीकरण, पुरातन मंदिरे व कुंडांची देखभाल-दुरुस्ती, शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण, वाहनतळांची उभारणी, स्वच्छतागृहांची वाढ आणि नूतनीकरण, अतिक्रमीत दुकानदारांचे पुनर्वसन, परिसरातील मंदिरांचे नुतनीकरण