क्राॅम्प्टन ग्रीव्हज Pudhari News network
नाशिक

Nashik Industry News | क्रॉम्प्टन ग्रीव्हजची 155 कोटींची गुंतवणूक

शुभवार्ता : वर्षभरापूर्वीच केले होते संशोधन केंद्राचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

अवंथा समूहाची कंपनी असलेल्या क्राॅम्प्टन ग्रीव्हजकडून नाशिक येथील प्रकल्पात 155 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. गेल्यावर्षी कंपनीने स्विचगिअर कॉम्प्लेक्समध्ये 1,600 केव्ही अल्ट्रा हाय व्होल्टेज संशोधन केंद्राचे उद्घाटन केले होते. त्यावेळी कंपनीने संशोधन आणि विकासाच्या क्षमता वाढविण्यासाठी 40 कोटींची गुंतवणूक केली होती. आता पुन्हा 155 कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याने, राेजगारवाढीसाठी त्याचा लाभ होणार आहे.

सीजी पॉवर आणि इंडस्ट्रियल सोल्युशन्स अर्थात क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीने भविष्यातील तब्बल 688 कोटींच्या गुंतवणुकीबाबतचे नुकतेच संकेत दिले आहेत. ही गुंतवणूक देशातील विविध प्रकल्पस्थळी केली जाणार आहे. त्यामध्ये अहमदनगर आणि गोव्यातील लो-टेन्शन मोटर्स प्रकल्पात 10 ते 18 लाख युनिट्स निर्मितीसाठी 327 काेटींची गुंतवणूक केली जाणार आहे. भोपाळमधील पॉवर ट्रान्स्फाॅर्मर 17 हजारांवरून 40 हजार एमव्हीपीनिर्मितीसाठी 131 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. ग्वोल्हेरमधील प्रकल्पात 40 कोटी, भोपाळमधील अतिरिक्त प्रकल्पात 35 कोटी तर नाशिकमधील स्विचगिअर प्रकल्पात 155 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

1200 केव्हीची स्विचगिअर पुरविणे शक्य

गतवर्षी उभारलेल्या संशोधन केंद्रात 1,600 केव्ही एसी आणि 3,600 केव्ही, 360 केजे क्षमतेची चाचणी क्षमता असलेले उपकरणे उभारण्यात आली आहेत. त्याद्वारे जागतिक दर्जाच्या उत्पादनांची चाचणी केली जात आहे. नाशिकमधील हे केंद्र जगभरातील ग्राहकांना एमव्ही (मीडियम व्होल्टेल) आणि एचव्ही (हाय व्होल्टेज) स्विचगिअर पुरवित असून, नवीन केंद्रामुळे ईएचव्ही व यूएचव्ही क्षमतेची 1,200 केव्हीची स्विचगिअर पुरविणे शक्य होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT