नांदगाव : नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर आनंद साजरा करताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे समवेत कार्यकर्ते. (छाया : सचिन बैरागी)
नाशिक

Nashik Nandgaon Election News : नांदगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा

नगराध्यक्षपदी सागर हिरे, माजी नगराध्यक्ष राजेश बनकर यांचा पराभव

पुढारी वृत्तसेवा

नांदगाव ( नाशिक ) : सचिन बैरागी

नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने नगरपरिषदेवर भगवा फडकवला. शिवसेनेचे सागर हिरे थेट नगराध्यक्षपदी विजयी झाले. माजी नगराध्यक्ष राजेश बनकर, भाजपचे संजय सानप यांना पराभव स्वीकारावा लागला.

नांदगाव येथील प्रशासकीय कार्यालयात रविवारी (दि. २१) सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. . एकूण ३ फेऱ्यांच्या माध्यमातून अवघ्या २ तासात निकाल घोषित करण्यात आला. शिवसेनेचे (शिंदे गट) नगराध्यक्षपदाचे उमेदवार सागर हिरे यांना यांना ७४८१ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बनकर यांना ४३१९ मते मिळाली. शिवसेनेचे सागर हिरे ३१६२ मताधिक्याने विजयी झाले. या आधी शिवसेनेचे ७ तर बिनविरोध तर निवडणुकीच्या माध्यमातून १२ असे एकूण १९ उमदेवार विजयी झाले. यामुळे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव नगरपरिषदेची सत्ता हाती कायम ठेवली.

प्रभागानुसार विजयी उमेदवार कंसात मते

नगराध्यक्षपद

  • सागर हिरे : ७४८३ (विजयी)

  • राजेश बनकर : ४३१९ (पराभूत)

  • ३१६४ मतांनी सागर हिरे विजयी

  • प्रभाग १ अ - कल्पना जगताप (शिवसेना शिंदे गट, ७५१) - विजयी

    गौतमी मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस अ. प गट - ४६१) पराभूत

  • प्रभाग १ ब - वाल्मिक टिळेकर (शिवसेना शिंदे गट, ७७४) -विजयी

    कमलेश पेहरे (राष्ट्रवादी काँग्रेस अ. प. गट -४४०) -पराभूत

  • प्रभाग ३ अ- विद्या कसबे (शिवसेना शिंदे गट -८६९) विजयी

    साक्षी अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प. गट - ५२३) पराभूत

  • प्रभाग ३ ब - राजेश शिंदे (शिवसेना शिंदे गट- ८७३) विजयी

    उल्हास कदम (राष्ट्रवादी काँग्रेस अ. प. गट - ७४१) पराभूत

  • प्रभाग ५ अ - स्नेहल पाटील (शिवसेना शिंदे गट - ६६७) विजयी

    सिंधूबाई देहाडराय (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प. गट - ३४४) पराभूत

  • प्रभाग ५ ब- सईद शेख (शिवसेना शिंदे गट - ८२०) विजयी

    योगेश सोनार (राष्ट्रवादी अ.प. गट - १८९) पराभूत

  • प्रभाग ७ अ - बाळू शेवरे (शिवसेना शिंदे गट - ६३२) विजयी

    राहुल अहिरे (अपक्ष- ६१७) पराभूत

  • प्रभाग ८ अ - पृथ्वीराज पाटील (शिवसेना शिंदे गट - ७७२) विजयी

    रमेश देहाडराय (राष्ट्रवादी अ.प. गट - ४५३) पराभूत

  • प्रभाग ९ अ - काका सोळसे (शिवसेना शिंदे गट - ३९१) विजयी

    अजय थोरात (अपक्ष - २९९) पराभूत

    अनिल जाधव (राष्ट्रवादी अ. प.गट - २४०) पराभूत

  • प्रभाग ९ ब - राखी महावीर (शिवसेना शिंदे गट - ६३५) विजयी

    राणी सोळसे (राष्ट्रवादी अ.प. गट - ३०३) पराभूत

  • प्रभाग १० अ - गायत्री शिंदे (शिवसेना शिंदे गट- ९८२) विजयी

    सुनीता पगार (राष्ट्रवादी अ.प. गट - २५१) पराभूत

  • प्रभाग १० ब - काशिनाथ देशमुख (अपक्ष- ९१२) विजयी

    संजय सानप (भाजप -१६९) पराभूत

नांदगाव शहराचा कारभार माझ्या हाती सोपवल्याबद्दल जनतेचा मी आभारी आहे. आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनातून शहराचा विकास करणार आहे. रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांना हक्काची जागा मिळवून देत अतिक्रमण प्रश्न मार्गी लावणार.
सागर हिरे, नगराध्यक्ष, नांदगाव

बिनविरोध निवडलेले शिंदे गटाचे नगरसेवक

स्वाती नावंदर, शोभा कासलीवाल, दीपक पांडव, योगिता खरोटे, किरण देवरे, वंदना कवडे, जुबेदाबी खान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT