file photo 
नाशिक

Nashik Murder : माजी सैनिक खूनातील संशयित ताब्यात, शनिवारपर्यंत दोघांना पोलिस कोठडी

गणेश सोनवणे

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- म्हसरूळ-आडगाव लिंकरोड परिसर वायुसेनेतील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या खूनाची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २७) सायंकाळी घडली होती. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास चक्र फिरवत अवघ्या काही तासात दोन संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविदत्त चौबे (वय-४२, रा. धात्रक फाटा) हे सोमवारी सायंकाळी पत्नी व मुलासोबत आडगाव म्हसरूळ लिंकरोडने कारने जाताना दोन ते तीन मुलांनी आरडाओरड करून चौबे यांची कार अडवून थांबविली. तेव्हा रविदत्त हे त्यांना समजविण्यास गेले असता संशयितांनी धारदार हत्याराने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

चौबे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून, म्हसरूळ पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून घेत अथर्व ऊर्फ गोज्या दिपक उगले (वय १९, रा. संभाजी चौक, म्हसरूळ) व ऋषिकेश ऊर्फ गटलू फकिरा दोंदे (वय २४, रा. राजवाडा, म्हसरूळ गाव) या दोन संशयितांना अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असून, त्यांना शनिवार (दि.२) पर्यंत कोठडी दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT