वणी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी शिवारात एका युवकाचा अज्ञात मारेकऱ्याने धारदार तीक्ष्ण हत्याराने तोंडावर व अन्य भागावर वार करुन खून केेेल्याची घटना उघडकीस आली आहे.
किशोर दगु उशीर, वय २६ वर्षे, राहणार खडकजांब ता. चांदवड असे खून झालेल्याचे नाव आहे. मयताचा मृतदेह लोखंडेवाडी शिवारात असलेल्या पालखेड धरणाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर व धरणाच्या आतील पाण्याच्या बाजुच्या भरावाच्या दगडांवर ओढत नेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत सुरेश सुधाकर कांडेकर, वय ३९ रा. खडकजांब (मयताचे नातवाईक) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकऱ्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयतास पोलिसांनी येथील ग्रामिण रुग्णालयात रात्री शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मात्र नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतदेह नाशिक येथे फॉरेन्सिक ओपिनियनसाठी पाठविण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे, पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा :