नाशिक : लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारयाद्यांतील सावळा गोंधळ दिसून आला. प्रभाग क्र.2, प्रभाग क्र. 24, प्रभाग क्र. 29 येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही मतदान केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवावी लागली.
दुसरीकडे बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांना नावे आढळत नसल्यामुळे किंवा अगोदरच्या मतदान केंद्राऐवजी भलत्याच ठिकाणी दूरवरील केंद्रावर मतदारांना नाव असल्यामुळे यंत्रणांना मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला. नाव दिसत नसल्याच्या गोंधळामुळे काहींनी मतदान करण्याऐवजी घरी परतणे पसंद केल्याचे चित्र होते.
शहरात अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याचा घटना घडल्याने मतदारांना वेटिंग करावी लागली. शहरातील आनंदवली येथील मतदान केंद्रावर ईव्हीएमचा बिघाड झाला. सिडकोतील प्रभाग 25 मध्ये एका मतदान केंद्रावर 4 पैकी एकच ईव्हीएम सुरू असल्यामुळे सुमारे तासभर मतदान ठप्प होते. अखेरीस नवीन ईव्हीएम आणल्यानंतर मतदान सुरू झाले.
धनुष्यबाणाचे बटन दाबल्यावर, भाजपचा लाइट लागत असल्याची तक्रार प्रभाग क्र. 24 मधील उमेदवार आणि मतदारांनी केल्याने शहरभर खळबळ उडवून दिली. पहिल्यापासून वादाचा प्रभाग ठरलेल्या या प्रभागातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमवर धनुष्यबाणाचे बटन दारबल्यानंतर भाजपच्या चिन्हापुढील लाइट लागत आहे, असा खळबळजनक दावा शिंदेसेनेच्ये उमेदवारांनी केला. ग्रामदेव शाळेत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या ठिकाणी ईव्हीएम बंद
प्रभाग 2 मध्ये सुरुवातीस मशीन बंद पडले, दोन मतदान ठप्प प्रभाग 24 मधील मॉडर्न हायस्कूलमध्ये खोली क्र.8 मध्ये ईव्हीएम बंद प्रभाग 29 मधील खोली क्र.2 मध्ये इव्हीएम पडले बंद पडले प्रभाग 26 मधील मॉडर्न स्कूलमध्ये ईव्हीएम बंदमुळे अर्धा तास थांबले मतदान प्रभाग 28 मध्ये विखे पाटील शाळेत ईव्हीएम दोन तास बंद प्रभाग 25 मध्ये एका मतदान केंद्रावर 4 पैकी एकच ईव्हीएम सुरू असल्यामुळे तासभर मतदान ठप्प अनेक मतदान केंद्रांवर उमेदवारांचे क्रम चुकले, उलटेसुलटे क्रम लावल्याने उमेदवारांत संभ्रम.