नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नाशिक महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.
या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त अन्य 12 पुरावे अनुज्ञेय असल्याचे नाशिक महानगरपालिका प्रभाग 8 ते 11 चे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.
असे आहेत पुरावे
भारताचा पासपोर्ट
आधार ओळखपत्र
वाहन चालविण्याचा परवाना
आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र
राज्य शासनाचे फोटो ओळखपत्र
राष्ट्रीयीकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र (MNREGA) जॉब कार्ड
निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इत्यादी
लोकसभा/ राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा/ विधान परिषद/ सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
स्वातंत्र्यसैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड. इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे