Documents Pudhari
नाशिक

Nashik Municipal Corporation Solar Project- सव्वादहा लाख गणना प्रपत्रांचे होणार पुनर्मुद्रण

३० नोव्हेंबरपर्यंत बीएलओंमार्फत प्रपत्रांचे वितरण करून भरून घेतले जाणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम-२०२६ राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना पुन्हा एकदा नाव नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी निवडणूक विभागाने सुमारे १० लाख २५ हजार गणना प्रपत्रांची छपाई करण्यासाठी कार्यवाही केली असून, ही प्रपत्रे संबंधित मतदारांपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत पोहोचविण्यात येणार आहेत.

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र नागरिक, मतदार यादीत नाव आढळून न आलेले मतदार, स्थलांतरित झालेले तसेच यापूर्वी मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नागरिकांना या माध्यमातून पुन्हा संधी मिळणार आहे.

संबंधित बीएलओ मतदारांना गणना प्रपत्र वितरित करून ते भरून घेणार आहेत. त्यामुळे प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गणना प्रपत्र भरून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

दरम्यान, गणना प्रपत्र भरून देण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर मुदत देण्यात आली आहे. प्रास्व मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त दावे हरकती निकाली काढण्यासाठी डिसेंबर २०२६ हा सुधारित कालाव निश्चित करण्यात आला आहे. त्यानंब २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतव यादी प्रसिद्ध केली जाणार आ जिल्ह्यातील १५ विधानस मतदारसंघांमध्ये ही प्रक्रिया राबवित जात असून, पात्र मतदारांचे नाव अंति मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासा निवडणूक यंत्रणेकडून प्रपत्र वितर आणि संकलनाची कार्यवाही केव जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT