नाशिक महानगरपालिका www.pudhari.news
नाशिक महानगरपालिका www.pudhari.news  
नाशिक

नाशिक महापालिकेस केंद्राचे दोन पुरस्कार; नवी दिल्लीत उद्या पुरस्कार वितरण सोहळा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व पीएम स्वनिधी योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केंद्रीय शहरी विकास व गृहनिर्माण मंत्रालयाकडून नाशिक महापालिकेला 'स्पार्क २०२३-२४ व फ्रेज २०२३-२४' हे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत

केंद्रीय शहरी विकास व गृहनिर्माण मंत्री मनोहर लाल तसेच राज्यमंत्री तोखान साहू यांच्या हस्ते गुरूवारी(दि.१८) नवी दिल्ली येथे आयोजित 'उत्कृष्ठता की और बढते कदम' या कार्यक्रमात महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना 'स्पार्क २०२३-२४ व फ्रेज २०२३-२४' या दोन पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने १८३६ महिला बचत गट तयार केले आहेत. यातील १६०१ लाभार्थाना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच १२,२३२ लाभार्थाना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. बेघर व्यक्तींकरिता दोन बेघर निवारे उभारण्यात आले आहेत. पीएम स्वनिधी योजने अंतर्गत नाशिक मनपाला २९,७२१ चे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या अनुषंगाने ४०,७५५ (१३७%) पथविक्रेत्यांनी योजनेसाठी बँकेकडे ऑनलाईन अर्ज केलेले आहे. बँकांनी ३८,२२८ (१२८%) कर्ज मंजूर केलेले आहे. त्यापैकी ३७,००७ (१२५%) पथविक्रेत्यांना कर्ज वितरण केलेले आहे. दोन्हीही योजनेत महापालिकेची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याचीच दखल घेत केंद्राने महापालिकेला दोन पुरस्कार जाहीर केले आहेत.

SCROLL FOR NEXT