नाशिक महानगरपालिका  Pudhari News Network
नाशिक

Nashik Kumbh Mela | सिंहस्थाच्या कामात अडथळे? नाशिक महापालिकेची सारवासारव; 'सगळं काही आलबेल' असल्याचा दावा

Nashik Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये अडथळे आणि वादाच्या चर्चांना उधाण आले असतानाच नाशिक महापालिका प्रशासनाने सारवासारव करत सर्व कामे सुरळीत सुरू असल्याचा दावा केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये अडथळे आणि वादाच्या चर्चांना उधाण आले असतानाच नाशिक महापालिका प्रशासनाने सारवासारव करत सर्व कामे सुरळीत सुरू असल्याचा दावा केला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांत काही नगरसेवक अडथळा आणत असल्याच्या तक्रारीत पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण तापले असताना महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी निवेदन प्रसिद्ध करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

शहरातील विविध कामे संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या समन्वयातूनच सुरू असल्याचे स्पष्ट करत सर्व नगरसेवकांच्या सहकायनि आणि मक्तेदारांशी समन्वय साधून कामे नियोजनानुसार प्रगतिपथावर आहेत. नगरसेवक आणि मक्तेदार यांच्यात कोणताही गैरसमज नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अलीकडेच पंचवटीसह काही भागांमध्ये सिंहस्थाशी संबंधित कामांमध्ये अडथळे, ठेकेदारांना त्रास आणि वाद निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे स्पष्टीकरण देत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, प्रत्यक्षात घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांमुळे प्रशासनाच्या या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात असून, आगामी काळात या कामांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT