सिडको : नाशिक महापालिका अतिक्रमण विभागाच्या अंबड औद्योगिक वसाहतीत गुरूवारी (दि.२९) दुपारी ३ वाजता अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत १५ शेड काढण्यात आले असून ११ टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. तसेच ६ ट्रकचे साहित्य जप्त करण्यात आले.
नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. मयुर पाटील व विभागीय अधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्या नेतृत्वाखाली अंबड औद्योगिक वसाहतीत गुरुवारी एक्सलो पॉईन्ट ते गरवारे चौकापर्यंत अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान १५ अनधिकृत शेड काढले तर ११ अनधिकृत टपऱ्या जमिनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या मोहिमेत सिडको पथक प्रमुख प्रदीप जाधव, मिलिंद ढोले रवींद्र काथवटे, निखिल तेजाळे, प्रकाश नाठे, मंदार परांडे, प्रवीण बागुल, बापू लांडगे, संजय सूर्यवंशी, संतोष पवार, जगन्नाथ हंबरे, रमेश शिंदे, भगवान सूर्यवंशी, प्रभाकर अभंग, मेघनाथ तिडके, प्रमोद आवळे यांच्यासह सहा विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.