Election Stay  Pudhari
नाशिक

Nashik MLC Election | महायुतीचा पेच कायम, इच्छुकांचा जीव टांगणीला

Nashik MLC Election | भाजप अंतर्गत इच्छुकांच्या संख्येत वाढ; सोनिया होळकर, अमृता पवारांचे नाव चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवार (दि. २५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असताना, नाशिकच्या जागेचा महायुतीतील पेच कायम आहे. वरिष्ठ पातळीवर जागावाटप होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही हा तिढा वरिष्ठ पातळीवर सुटलेला नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे, नाशिकच्या जागेसाठी भाजपचा हट्ट वाढत असताना इच्छुकांची संख्याही वाढत आहे.

शिवसेनेतही आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे, नरेंद्र दराडे यांच्यासह वाढत्या इच्छुकांमुळे शिवसेनेत उमेदवारीची स्पर्धा वाढली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. जळगावच्या बदल्यात नाशिकची जागा भाजपकडे घेण्यास मंत्री गिरीश महाजन यांनी अनुकूलता दर्शविल्याने भाजपला जागा सुटण्याची शक्यता वाढली आहे.

असे असले तरी जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले आहे. असे असले, तरी मंत्री महाजन जागा खेचून आणतील या विश्वासावर भाजपअंतर्गत इच्छुकांची संख्याही वाढत आहे.

भाजपकडून स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय नीलेश बोरा, सुरेश अण्णा पाटील, बापू पिंगळे यांच्या नावांची चर्चा असतानाच लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, सुनील केदार, प्रदीप पेशकार यांची नावेही पुढे आली आहेत. महिला उमेदवारांबाबतही पक्षांतर्गत चर्चा आहे.

यात लासलगाव येथील होळकर कुटुंबीयातील सोनिया होळकर यांची चर्चा आहे. यातच माजी महिला जिल्हाध्यक्षा अमृता पवार यांचे नावही पुढे आले आहे. अमृता पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या नावांचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाविकास आघाडीत शांतता महाविकास आघाडीत जागा कोणी लढवायची याबाबत अद्याप निश्चिती नाही. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून सूतोवाच होईल अशी अपेक्षा होती.

मात्र, त्यांच्याकडूनही संकेत मिळाले नाही. महायुतीत शिवसेना व भाजपमध्ये जागेवरून वाद सुरू आहे. यात दोघेही स्वतंत्र लढल्यास उमेदवार निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे. जागा अन् उमेदवार याबाबत प्रदेश पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेत उमेदवारीसाठी स्पर्धा

शिवसेनेकडून माजी आमदार दराडे यांच्यासह अंजुम कदि यांचे नाव आघाडीवर आहे. अजय बोरस्ते, भाऊसाहेब चौधरी यांच्या नावांची चर्चा पक्षांतर्गत आहे. त्यातच, उमेदवारी मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लॉबिंग केले जात असल्याचे समजते. याशिवाय नव्या चेहऱ्यांचाही शोध सुरू असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT