बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्यानाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिर Pudhari News Network
नाशिक

Nashik MahaShivratri | महाशिवरात्र निमित्त उद्यापासून त्र्यंबकेश्वरला विविध कार्यक्रम

Nashik - Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्र निमित्त महत्वाचा निर्णय

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. यंदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाशिवरात्र निमित्त उद्यापासून त्र्यंबकेश्वरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवस 24 तास खुले राहणार मंदीर

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्री निमित्ताने जोरदार तयारी केली जात आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवार (दि.26) व गुरुवार (दि.27) रोजी दोन दिवस चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे बुधवार (दि.26) रोजीला पहाटे चारपासून ते गुरुवार (दि.27) रात्री नऊपर्यंत भाविकांसाठी मंदिर राहणार चोवीस तास खुले राहणार आहे.

बुधवारी देणगी दर्शन संपूर्ण दिवस बंद

महाशिवरात्र निमित्ताने दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट घेतलेल्या निर्णयानुसार सर्व प्रकारचे व्हिआयपी, प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. बुधवारी (दि.26) रोजी देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे महाशिवरात्र दिवशी त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे समाधानकारक दर्शन होणार आहे.

मंदिरात करणार आकर्षक फुलांची सजावट

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल

महाशिवरात्री उत्सवानिमित्त ट्रस्टतर्फे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाशिवरात्री हा सण शिव आणि पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे स्मरण केले जात असल्याने सोमवारी (दि.24) मेहंदी तसेच मंगळवारी (दि. 25) हळदीचा समारंभ होणार आहे. सायंकाळी बासरी वादन कार्यक्रम होणार आहे.

बुधवारी (दि.26) दुपारी श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघणार आहे. पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे. पालखी दरम्यान शिव तांडव ग्रुपतर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत शिवार्पणमस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार सादर करणार आहेत. ट्रस्टतर्फे बुधवारी (दि. 26) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे. विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री होणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान देवस्थान ट्रस्टमार्फत कळविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT