नाशिक : ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने नांदुरनाका ते मढी पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार (दि.10) पासून या पायी दिंडला सुरुवात झाली असून बुधवार (दि.19) रोजी ही पालखी मढी येथे पोहोचणार आहे.
बुधवार (दि.19) रोजी मढी येथे दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. यात्रेत येणाऱ्या भक्तांनी या पालखी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन ॐ चैतन्य कानिफनाथ दरबार नांदुरनाका यांनी केले आहे. उन्हाच्या काहीलीपासून बचाव होण्यासाठी तसेच भक्तांचा विचार करुन कोणत्याही पायी पालखी दिंडीतील भक्तांसाठी दोन्ही वेळेच्या भोजनाची सोय करण्यात आलेली आहे. दिंडी आयोजक नितीन निरभवणे, आकाश पाडेकर, राहुल कर्डेक, विलास पिंपळे, गणेश वरघडे, संतोष इंगळे, तान्हाजी गांगुर्डे, ऋतिक साळवे आदी दिंडीमध्ये सहभागी होत उत्स्फूर्तपणे सहकार्य करत आहेत.