Wardha accident Pudhari
नाशिक

Nashik accident news: भीषण अपघात! नाशिकमध्ये लक्झरी बस-टँकरची धडक, एकाचा जागीच मृत्यू

अकोटवरून इंदोरकडे जाणारी प्रवासी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या केमिकल टँकरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : मुक्ताईनगर शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि.६) रात्री उशीरा लक्झरी बस व टँकरच्या भीषण अपघातात एकजण ठार झाल्याची घटना घडली आहे.

मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमी जवळ, महादेव मंदिरासमोर झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. अकोटवरून इंदोरकडे जाणारी प्रवासी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या केमिकल टँकरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात टँकरमधील एक व्यक्ती जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, सुदैवाने ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

लक्झरी बस व टँकरची धडक इतकी जबर होती की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघातामुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी व्यक्तीस उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT