चांदवड - तालुक्यातील भडाणे गावचे शेतकरी रामदास सीताराम आहेर (47) हे रात्रीच्या वेळी घरी जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला या घटनेत शेतकरी रक्ताबंबाळ झाले. त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले.
यावेळी शेतकऱ्याच्या घरच्यांनी एकच टाहो फोडला, या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, वनपाल प्रकाश सोमवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी भडाने येथील शेतकऱ्यांनी फटाके वाजवून बिबटयाला पळवून लावले नागरिकांनी अख्खी रात्र जागून काढली. ही घटना गुरुवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली.