नांदूर : बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत भूमिका मांडताना कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेख-सिंह. महापौर हिमगौरी आहेर - आडके. 
नाशिक

Nashik land acquisition compensation for affected farmers- प्रलंबित भूसंपादन भरपाईचा मार्ग मोकळा

आयुक्त मनीषा खत्री : बाधित शेतकऱ्यांना ३० टक्के मोबदला मिळणार

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

नांदूर नाका ते जत्रा चौक रस्त्यासाठी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना २४ वर्षांपासून रखडलेला भूसंपादनाचा मोबदला येत्या आठवडाभरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जुन्या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांना सुरुवातीला ३० टक्के रक्कम दिली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.

-नांदूर येथे शुक्रवारी (दि. १८) बाधित शेतकऱ्यांच्या आयोजित बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नगरसेवक रिद्धीश निमसे आणि स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे उपस्थित होते.

आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार जुन्या भूसंपादित जागांचे पैसे दिले जाणार आहेत. यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचे वितरण बाधित शेतकऱ्यांना केले जाईल. टाकळी रोडची मोजणी करून त्याच्या भूसंपादनाचा प्रस्तावही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुढे पाठविला जाणार आहे.

नांदूर, टाकळी व नाशिक शिवारात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामसाठी एक वर्षाच्या तात्पुरत्या भाडेतत्त्वावर जागा घेतली जात आहे. या जागेवर कायमस्वरूपी आरक्षण टाकले जाण्याच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी हरकती नोंदवत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर स्पष्टीकरण देताना आयुक्तांनी आश्वस्त केले की, वाढीव साधुग्रामच्या जागेवर कोणतेह कायमस्वरूपी आरक्षण टाकले जाणार नाही.

भागात महापालिकेकडे ले आउटसाठी अज केल्यास त्यांना मंजुरी दिली जाईल. कुंभमेळ प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केल की, साधुग्रामच्या तात्पुरत्या जागेच्या आरक्षणाचा विषयच उद्भवत नाही. ज्या मूळ जागा आरक्षित आहेत, त्यांचेच अधिग्रहणाचे काम होईल तात्पुरत्या स्वरूपात घेतल्या जाणाऱ्या वाढीव जागेबाबत शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसांमधील खरेदी विक्रीच्या निर्बंधांचा मुद्दा रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT