Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | नरेंद्राचार्य महाराजांच्या उपस्थितीत सिंहस्थ ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन

Nashik Simhastha Kumbh Mela | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, नाशिक यांच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभशिलान्यास पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, नाशिक यांच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभशिलान्यास पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दि. ११ जून रोजी सकाळी ९ वाजता हा धार्मिक सोहळा होणार असून, जगद्‌गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिजधाम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी मंगळवारी (दि. २६) गोवा येथील गोवेश्वर महादेव मंदिरात जाऊन जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले . यावेळी निमंत्रणाचा स्वीकार करत कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा ध्वजस्तंभ शिलान्यास सोहळा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात धार्मिक असून परंपरा, वारसा आध्यात्मिक आणि कुंभमेळ्याच्या तयारीचा शुभारंभ म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. या सोहळ्यास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार विविध असून आखाड्यांचे साधू-संत, महंत, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT