नाशिक - पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरात पोलीस बंदोबस्त Pudhari News Network
नाशिक

Nashik Kate Galli Update | नाशिकमध्ये धार्मिक स्थळाचे प्रकरण पुन्हा चर्चेत

धार्मिक स्थळावरुन वाहतूक मार्ग बंद; 144 लागू

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - नाशिक - पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील धार्मिक स्थळाचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. गेल्या पंचवीस वर्षांचा पाठपुरावा करूनही नाशिक महानगरपालिका अनधिकृत धार्मिक स्थळ हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनानी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.

नाशिक - पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एक धार्मिक स्थळ गेल्या पंचवीस वर्षांचा पाठपुरावा करून ही नाशिक महानगरपालिका धार्मिक स्थळ हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. काठे गल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप करण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठे गल्ली परिसरात शनिवार (दि.22) रोजी सकाळी 6 वाजेपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटिल होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काठे गल्लीसह द्वारका भागात शनिवारी (दि.22) रोजी जमावबंदी लागू केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी जारी केले आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी पुणे रोडवरील द्वारका ते काठे गल्ली व आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आले असून, वाहने पर्यायी मार्गाने नेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

वाहतुकीसाठी या मार्गावरील प्रवेश बंद

  • राघोजी भांगरे चौक ते साहिल लॉन्सकडे जाणारा- येणारा रस्ता

  • नागजी चौक ते काठे गल्ली सिग्नल ते नागजी जाणारा-येणारा मार्ग

  • उस्मानिया चौक ते मुरादबाबा दर्गा जाणारा-येणारा मार्ग

  • पुणे हायवेने नाशिक रोडकडून द्वारकाकडे येणारा- जाणारा मार्ग

  • पंचवटीकडील महामार्गावरील संतोष टी पॉइंटकडून द्वारकाकडे येणारी वाहने

  • इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडून सव्र्व्हिस रोडने मुंबई नाक्याकडे येणारी वाहने

  • सारडा सर्कलकडून द्वारका सर्कलकडे येणारी सर्व वाहने

  • मुंबई नाक्याकडून द्वारका सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग खुले

बिटको पॉइंट, नांदूर नाका, फेम सिग्नल, जनार्दन स्वामी मठ, संभाजीनगर रोड, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमार्गे सिटी सेंटर मॉल, गडकरी चौक.

सकल हिंदू समाजाने केले आवाहन

काठेगल्लीतील मनपाच्या भुखंडावरील धार्मिक स्थळ हटिवण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली असून शनिवारी (दि.22) रोजी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देशील सोशल मिडीयावरुन प्रसारीत करण्यात आला होता. हिंदू समाजाच्या आवाहनानंतर दुस-या समाजाचने देखील धार्मिक स्थळ बचावासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT