हजारो गुंतवणूकदारांना ठगविणारा काळे लासलगाव पोलिसांच्या ताब्यात  File Photo
नाशिक

Nashik | हजारो गुंतवणूकदारांना ठगविणारा काळे लासलगाव पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापून त्याद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित सतीश काळे याचा लासलगाव पोलिसांना धाराशिव पोलिसांकडून ताबा घेतला. दुसरा फरार संशयित योगेश काळे विरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी करत त्याच्या शोधासाठी पथके रवाना केल्याची माहिती निफाडचे पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे यांनी दिली.

मंगळवारी आणि बुधवारी लासलगाव पोलिस ठाण्यात निफाडचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलेश पालवे, लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी जाब जबाब नोंदवले असून काही एजंट व कर्मचाऱ्यांचीही चाैकशी केली. मंगळवारी सतीश काळे यांचा ताबा घेतल्यानंतर बुधवारी (दि. ९) पहाटे त्यास लासलगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर पथकाने संशयित काळेच्या टाकळी विंचूर येथील श्रीराम फायनान्स कार्यालयाचे सील तोडून तपासणी केली. तसेच त्याच्या निवासस्थानी पंचनामा करण्यात आला. यावेळी डी.व्ही आर. जप्त करण्यात आला असून घराची झडती घेण्यात आली. व्यवस्थापक अनिता शिंदे यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. संशयितांची बँक खाते पोलिसांनी गोठवली आहेत. तसेच बँक व्यवहाराचे चेक देण्यात आले त्याची माहिती पोलिस घेत आहेत. पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पोलिस अधिकारी पोलिस कार्यालयात ठान मांडून आहेत. नागरिकांनी आणि गुंतवणुकदारांनी घाबरून न जाता पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून तक्रारी द्याव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी

आपल्या गुंतवणुकविषयी माहिती द्यावी व कागदपत्रे जमा करावीत. जे दोषी असतील त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाई करतीलच पण नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. घाबरून न जाता आपल्याकडील गुंतवणुकीबाबत जी माहिती दिली जाईल, ती गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे यांनी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT