रोजगार मेळावा  file photo
नाशिक

नाशिक : मविप्र 'आयटीआय'मध्ये येत्या गुरुवारी रोजगार मेळावा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) गुरुवारी (दि. १२) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आयटीआय विविध ट्रेंड उत्तीर्ण किंवा ॲपियर (अंतिम परीक्षेस बसलेल्या) विद्यार्थ्यांसाठी ॲप्रेंटिस/ट्रेनिंग आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्यात विविध कंपन्यांचे व्यवस्थापन अधिकारी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांनी 'मविप्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उदाजी मराठा बोर्डिंग आवार, माणिकनगर, गंगापूररोड, नाशिक – १३' या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहून नोकरीसाठीच्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व संस्थेचे पदाधिकारी, संचालक, शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT