Hostel Girls Harassment 
नाशिक

Hostel Girls Harassment | हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवून धमकी; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Hostel Girls Harassment | अंबड गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित हा पेठ येथे असल्याची माहिती मिळाली होती.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या तरुणींना वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अश्लील व्हिडिओ पाठवून त्रास देणे तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील संशयिताला गुन्हे शाखा अंबड युनिट-३ च्या पथकाने पेठ येथून ताब्यात घेतले. प्रसाद मारुती माळी (२१, रा. मूळ पो. सोनेवाडी, पाण्याच्या टाकीजवळ, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात शुक्रवारी (२०) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी तरुणी आणि तिची मैत्रीण शिक्षणासाठी होस्टेलमध्ये राहात असताना संशयित प्रसाद माळी हा त्यांना वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अश्लील व्हिडिओ पाठवून त्रास देत होता.

त्याचबरोबर जिवे मारण्याची धमकीही देत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत गुन्हे शाखेने त्याचा शोध सुरू केला होता. अंबड गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित हा पेठ येथे असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलिस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण आणि पोलिस अंमलदार कुणाल पचलोरे यांच्या पथकाने मंगळवारी (२४) रात्री ९.३० च्या सुमारास पेठ येथील शिवांजली हॉटेल येथे सापळा रचत प्रसाद माळीला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT