नाशिक : नाशिक रोड येथील जगताप मळा येथे बेवारस अर्भकाला कुत्र्याने खाल्ले असल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ६) उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण सात ते आठ महिन्यांचे अर्भक असून, जगताप मळा चौकातील एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या एका कारागिरास मृतावस्थेत अर्भक आढळून आले होते. कुत्र्याने तोडलेल्या लचक्यांमुळे त्या अर्भकाची अवस्था पाहून पोलिसही हळहळले. याबाबत अधिक तपास उपनगर पोलिस करत आहेत.