जिल्ह्यात चार गणेशभक्तांचा मृत्यू, एक बेपत्ता file photo
नाशिक

Nashik News : जिल्ह्यात चार गणेशभक्तांचा मृत्यू, एक बेपत्ता

पाण्याच्या वेगवान प्रवाहात बुडून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

नाशिक: नाशिक शहर व जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, एक जण अजूनही बेपत्ता आहे. मागील काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने, नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश धरणे व बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, विसर्जन दिवशी नदी, नाल्यांना पूर आला होता. पाण्याच्या वेगवान प्रवाहात बुडून चार गणेशभक्तांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

आनंदवली येथे शनिवारी (दि. ६) सार्यसाळच्या सुमारास नदीच्या प्रचाहात दोघे गणेशभक्त वाहन गेल्याची घटना घडली होती. यातील एक जण पीहून बाहेर आल्याने तो बच्चावला, तर दुसरा युवक पाण्याच्या प्रगहात वाहनू गेला असून, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. रविवारी (दि. ७) सकाळी अग्रिशमन दलाकडून बेपता युवकाचा गुन्हा शोध घेण्यात आला. मात्र, त्यात यश आले नाही. प्रवीण शांताराम चव्हाण (२५, चाळीसगाव, जि. जळगाव) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. दुसरी घटना म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या दगडी खाणीत घडली. शनिवारी (दि. ६) दुपारी तीन वाजता चंदर नधू माळेकर (२९, रा. म्हसोबावाडी, बोरगड) ता गणपती विसर्जनासाठी विद्यापीठालगतच्या तलावात उतरला असता त्याचा बुजून मृत्यू झाला, याबाबत, म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तिसरी घटना सिन्नर येथे घडली. सिनर शहराजवळ असण्याऱ्या सरदवाडी धरणात ओमप्रकाश सुंदरलाल लिलामे (४० रा. सिल्वार लोटस स्कूलकनळ, सिफर) हा विसर्जनासाठी पाण्यात उतरला असता, पाय पसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. चौथी पटना कळवण तालुक्यातील मौजे देसराणे येथे पुनद नदीत घडली, गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दिनेश बाबूराव राजभोज (३९) यांच्या पात्रालगत असलेल्या फरशीवरून पाय घसरून ते नदीपात्रात पडले. नदीला प्रवाह जास्त असल्याने, बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सापाइला असून, पाचवी पटना नाशिक तालुक्यातील गोवर्धन शिवारात गाडली विष्णू बगळे (३४, रा. गंगापूर) यांचा गोदावरी नदीत बाहुन मेल्याने मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT