Petrol Pumps : पेट्रोल पंपांवर वाहनांच्या पुन्हा रांगा file photo
नाशिक

Petrol Pump Crowds | इंधनपुरवठा सुरळीत असताना नाहक गर्दी

Petrol Pump Crowds | सोशल मीडियावरील अफवांमुळे पेट्रोलपंपांवर होणारी अनियंत्रित गर्दी व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे पेट्रोलपंपधारक हैराण झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावरील अफवांमुळे पेट्रोलपंपांवर होणारी अनियंत्रित गर्दी व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे पेट्रोलपंपधारक हैराण झाले आहेत. मुबलक इंधन उपलब्ध असताना अफवांमुळे होणारी गर्दी डोकेदुखी ठरत आहे.

याबाबत पेट्रोलपंप संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत उपाययोजनांची मागणी केली आहे. जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाद्वारे इंधनटंचाईबाबत अफवा पसरत आहेत.

राज्य व परराज्यातील पेट्रोलपंपांवरील गर्दीचे व्हिडिओ प्रसारित होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये इंधन संपण्याची भीती आहे. परिणामी, नागरिक पेट्रोलपंपांवर गर्दी करत आहे. ही परिस्थिती नाशिकसह मालेगाव, पिंपळगाव व इतर तालुक्यांत दिसत आहे.

यामुळे पंपांवरही अतिरिक्त ताण येत तेथेही तुटवडा निर्माण होतो. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. क्रेडिट बंद, पैसे पाठवा अन् इंधन घ्या सरकार व तेल कंपन्यांकडून इंधन तुटवडा नसल्याचे जाहीर केले जात

असले तरी मनमाड डेपोतून होणाऱ्या पुरवठ्यात अडचणी येत आहेत. तेल कंपन्यांनी क्रेडिट बंद केल्यामुळे डीलर्सना आगाऊ पैसे भरूनही वेळेत टैंकर उपलब्ध होत नाहीत. आपण हस्तक्षेप करत योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT