दुस-या दिवशीही सीएनजी टंचाई pudhari photo
नाशिक

Nashik LPG CNG Shortage | ऑटोरिक्षा प्रवास महागला, पंपांवर लांबपर्यंत रांगा; सिटीलिंकची भाडेवाढ शक्य

Nashik LPG CNG Shortage | आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता भारतालाही बसत असून एलपीजी, सीएनजीचा पुरवठा प्रभानित होऊ लागल्याने खासगी प्रवास महागण्याची चिन्हे आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता भारतालाही बसत असून एलपीजी, सीएनजीचा पुरवठा प्रभानित होऊ लागल्याने खासगी प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. शहरातील एलपीजीवर चालणाऱ्या ऑटोरिक्षाची भाडेवाढ करण्यात आली असून, शहराची लाइफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिटीलिकची भाडेवाढदेखील केली जाण्याची शक्यता आहे.

एलपीजीचा पुरवठा खंडित होताना आठवड्याच्या प्रारंभीच एलपीजीचे दर ५३.७३ रुपयांवरून ६७.९५ रुपयांवर गेले. एलपीजीच्या दरात तब्बल १४.२२ रुपयांची वाढ केल्याने, एलपीजीवर धावणान्या ऑटोरिक्षाची भाडेवाढ करण्यात आली आहे. तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी दरवाढ केल्याने, खासगी प्रवास महागला आहे.

अचानक केलेल्या या भाडेवाढीमुळे प्रवासीदेखील अचंबित झाले असून, युद्धाचा स्पष्ट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे शहराची लाइफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिटीलिंक बसेसचा प्रयास देखील महागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एलपीजीप्रमाणे सीएनजीचादेखील तुटवडा निर्माण झाल्याने, सीएनजीवर धावणाऱ्या सिटीलिक बसेसच्या प्रवासी भाड्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. शहरात सिटीलिंकच्या एकूण २४४ बसेस धावत असून, त्यातील ५० बसेस डिझेलवर धावतात.

तर उर्वरित १९४बसेस या सीएनजीवर धावतात. दरम्यान, सिटीलिकचे प्रवासी भाडे वाढविण्याबायत अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झाला नसला तरी, सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यास सिटीलिंक व्यवस्थापनाकडून याबाबतचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

अफवा, चिंता अन् खुलासा

एलपीजी, सीएनजी, पेट्रोल-डिझेलबाबत समाजमाध्यमांवर अफवांचे पेव फुटल्याने, सर्वसामान्यांमध्ये वितेचे जग गडद होत आहेत. घरगुती गॅस सिलिंडरसाठी नाशिककरांकडून थेट एजन्सी गाठत नंबर लावले जात आहेत. बऱ्याचशा नागरिकांकडून अधिकचे पैसे मोजून ब्लॅकने सिलिंडर घेतले जात आहे.

घरगुती गॅस सिलिंडरप्रमाणेच एलपीजी आणि सीएनजीसाठी नागरिकांकडून धावाधाव केली जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नागरिकांमधील वाढत्या अस्वस्थेमुळे एचपीसीएलने खुलासा करीत अशा प्रकारच्या चर्चा या निराधार असून, त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. इंधनाचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही एचपीसीएलने केले आहे.

पंपांवर रांगा

एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्याने, शहरातील एलपीजी पंपांवर वाहनांच्या विशेषतः ऑटोरिक्षाच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत. याशिवाय सीएनजीसाठीदेखील वाहनांच्या एक किलोमीटरपेक्षा अधिक रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. एलपीजी, सीएनजी पुढील काही दिवस पुरेल इतकेच उपलब्ध असल्याने, युद्धाची चग कायम राहिल्यास पुढील काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

'लॉजिंग' वर परिणाम आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून नाशिकचा लौकिक असल्याने, नाशिकमध्ये वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते. अशात नाशिकमध्ये लॉजिंग व्यवसाय जोरात आहे. मात्र, एलपीजीच्या पुरवठ्याचा परिणाम या व्यवसायावर झाल्याचे दिसून येत आहे. लॉजिंगचे किचन बंद ठेवाये लागत असल्याने, पर्यटकांची मोती गैरसोय होत आहे. लॉज मालकांकडून भाडेवाढ करण्यात आल्याने, पर्यटकांची संख्या रोडवल्याचे लॉज चालकांकडून सांगितले जात आहे. सीएनजीचा अद्याप कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसल्याने, त्याचा सिटीलिकच्या सेवांवर परिणाम झाला नाही. ही परिस्थिती कायम राहिल्यास अन् सीएनजीच्या पुरवठ्यात काही अडचणी उद्भवल्यास बसेसच्या फेऱ्यांमध्ये कपात केली जाऊ शकेल. मात्र, या सर्व संभावना आहेत. आताच सांगणे अवघड आहे.
- बाजीराव माळी, महाव्यवस्थापक, सिटीलिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT