नाशिक : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकरी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. यांना अन्नधान्य टंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाकडून मदतकार्य गतीमान करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांत १००० कुटुंबांना सुमारे ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे धान्य वाटप करण्याचे पारशाने जाहीर केले तरी अजून काही तालुक्यांना वाटपाबाबत अजून संभ्रम आहे.
पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने जीवनावश्यक गरजा पूर्ण करून देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग युद्धपातळीवर कार्यरत असून बाधितांना तांदूळ व डाळीचे वाटप काही तालुक्यात करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तालुक्यांना पुरग्रस्त जिल्ह्यांमध्येही धान्यकिट वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. यात अनेकांचे संसार उपयोगी वस्तू वाहून गेले आहे. यामुळे शासन पातळीवरून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. धान्य वाटपासोबतच शेतकऱ्यांसाठी मदत निधी, तसेच पिक विमा योजनेअंतर्गत तातडीने सर्वेक्षण व नुकसान भरपाई देण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले आहेत.
जिल्ह्यात पंधराशेहून गावे बाधित
१ ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसाने जिल्ह्यात १,५०० हून अधिक गावे बाधित झाली होती. जवळपास ६५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून ३ लाख शेतकरी बाधित झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामध्ये विशेषतः येवला, नांदगाव, निफाड आणि पेठ तालुके अतिवृष्टीमुळे सर्वाधिक प्रभावित झाले होते.
बाधित कुटुंबांनात तातडीची मदत
बाधिताना तातडीची मदत म्हणून प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ३ किलो तूरडाळ या प्रमाणे नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ४३२ कुटुंबांना मदत मिळाली असून निफाड तालुक्यातील ३९५ कुटुंबांना धान्य पुरवण्यात आले. त्याचबरोबर येवला तालुक्यात १२० कुटुंबांना व पेठ तालुक्यात ५३ कुटुंबांना शासनाकडून धान्याचे वाटप करण्यात नियोजन असल्याची माहिती अधिकृत अहवालातून समोर आली आहे.
शासनाकडून जाहीर झालेले आकडे
एकूण कुटुंबे १०००
गहू १०० क्विंटल
तांदूळ १०० क्विंटल
तूरडाळ ३० क्विंटल
एकूण रक्कम ३३००००