Indigo Flight Pudhari news network
नाशिक

Nashik Flight | नाशिकहून ४२ आंतरराष्ट्रीय शहरांना जोडणारी विमानसेवा

'इंडिगो'कडून हिवाळी वेळापत्रक जाहीर : गोवा, इंदूर, जयपूरसाठीही फ्लाइट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गेल्या १२ सप्टेंबरपासून 'इंडिगो' कंपनीकडून नाशिकच्या ओझर विमानतळावरून कनेक्टिंग पद्धतीने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात आली असून, हिवाळी वेळापत्रकानुसार ४२ आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये नाशिकहून कनेक्टिंग पद्धतीने पोहोचता येणार आहे. या व्यतिरिक्त देशांतर्गत ५२ शहरांसाठीही वेळापत्रक निश्चित केले असून, गोवा, इंदूर, जयपूरसाठीही फ्लाइट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (As per the winter schedule, 42 international cities can be reached from Nashik by connecting method)

२७ ऑक्टोबरपासून देशात विंटर शेड्यूल सुरू होत असते. त्यामुळे डीजीसीएच्या मंजुरीनंतर विमानसेवांच्या वेळांमध्ये बदल होत असतात. त्यानुसार नाशिककरांना इंडिगोकडून दिल्या जाणाऱ्या गोवा, इंदूर, नागपूर, बंगळुरू, हैदराबाद या विमानसेवेच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

आनंदाची बाब म्हणजे २७ ऑक्टोबरपासून पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरसाठीही नाशिकहून विमानसेवा सुरू होत आहे. नव्या बदलानुसार, गोवा, अहमदाबाद, दिल्लीला जाणाऱ्या विमानांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये अबुधाबी, बँकॉक, बबाली, कोलोम्बो, शिकागो, दुबई, हाँगकाँग, काठमांडू, मॉरिशस, वॉशिंग्टन आदी ४२ प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांना दररोज कनेक्टिंग पद्धतीने फ्लाइट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान, नाशिकहून सुरू असलेल्या विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने कंपनी व्यवस्थापनात समाधानाचे वातावरण आहे.

वेळापत्रकानुसार नवे बदल

  • इंदूरहून नाशिकसाठी सकाळी ९.३० ऐवजी दुपारी १.१० वाजता टेकऑफ, तर नाशिकला दुपारी २.२० वाजता लॅण्डिंग होईल.

  • नाशिकहून इंदूरकरिता सकाळी ११.०५ ऐवजी दुपारी २.४० वाजता टेकऑफ होऊन दुपारी ३.५० वाजता लॅण्डिंग होईल.

  • नाशिकहून बंगळुरूकडे दुपारी ४.३० ऐवजी आता ३.३० वाजता, तर हैदराबादसाठी दुपारी २.२५ ऐवजी १२.३० वाजता टेकऑफ होईल.

  • गोव्याकरिता दुपारी १२.३० ऐवजी सकाळी ९.४५ वाजता फ्लाइट असेल. ती पूर्वीच्या दुपारी ४.५५ ऐवजी ११.२५ वाजता पोहोचेल.

  • अहमदाबादहून सकाळी १०.५५ ऐवजी ९.०५ वाजता फ्लाइट असेल. लॅण्डिंग मात्र पूर्वीच्याच वेळेला होणार आहे.

  • नाशिकहून अहमदाबादसाठी सायंकाळी ५.४५ वाजता टेकऑफ होऊन लॅण्डिंग सायंकाळी ६.५५ वाजता होईल.

  • दिल्लीहून नाशिकसाठी सकाळी ६.५५ ऐवजी ६.२५ वाजता टेकऑफ, तर नाशिक विमानतळावर सकाळी पूर्वीच्या वेळेच्या १० मिनिटे आधी म्हणजे सकाळी ८.४० वाजता लॅण्डिंग होईल.

नाशिककरांना या शेड्यूलमध्ये जयपूरसाठी इंदूरमार्गे नवी सेवा मिळाली असून, तीन तासांत पोहोचता येणार आहे. गोव्यासाठी दाबोलिम विमानतळावरून सेवा आहे, तर बंगळुरूसाठी एक तास, हैदराबादसाठी दोन तास अगोदरच्या वेळा मिळाल्याने त्या अजून फायदेशीर आहेत.
मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, निमा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT