चांदवड : राहूड घाटाच्या पायथ्याशी धावता कंटेरनर उलटून त्यावरील अवजड लोखंडी पाइप निसटून महामार्गावर पडल्याने पाच हेल्पर गंभीर जखमी झाले. अपघातानंतर लोखंडी पाइप महामार्गापासून ५० ते ६० फुट खोल खाली कोसळला होता. साेमवारी (दि. १३) दुपारी ही घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई येथून कोलकाता येथील एका कंपनीच्या बॉयलरचा माेठ्या आकाराचा पाईप कंटेनर (एमएच ०४, एफडी १२९३) द्वारे कोलकाताकडे घेऊन जात होता. कंटेनर राहूड घाट उतरत असताना उतारावर कंटेनर उटल्याने त्यावरील लोखंडी पाइप निसटून रस्त्यावर पडला व घरंगळत ५० ते ६० फूल खोल खाली गेला. या अपघातात कंटेनरवरील पाच हेल्परही खोली कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच सोमा टोलवेज व १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर्स डॉ. भालचंद्र पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ, हवालदार भाऊलाल हेंबाडे, विक्रम बस्ते, सुनील जाधव यांनी अपघातस्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शांतनू विश्वास (३०, कोलकत्ता), तारीफ विश्वास (३८, परगणा, पश्चिम बंगाल), मोहम्मद एजाज (२६, संत कबीरनगर इलाहाबाद), सपोवन कुमार गिरी (४१, परगणा, पश्चिम बंगाल), व्हेरीगुन विश्वास (४५).