इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या फेरीसाठी निवडयादी प्रसिद्ध  file photo
नाशिक

नाशिक | अकरावी प्रवेशासाठी पहिली निवडयादी आज जाहीर होणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्या ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रियेची नोंदणी प्रक्रिया मुदत संपल्यानंतर पहिल्या फेरीसाठी गुरुवारी (दि. २७) निवडयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

शहरातील ६८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये अकरावीसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी अर्जाचा भाग एक व भाग दोन भरल्यावर गुणवत्तायादी प्रसिद्धीची प्रक्रिया पार पडली. आता पात्रताधारक विद्यार्थ्यांमधून पहिल्या नियमित फेरीत विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. दि. २२ ते २६ जून हा कालावधी शिक्षण विभागाने माहितीचे विश्लेषण करण्यासाठी राखीव ठेवला होता. विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम व मिळालेले गुण या आधारावर माहिती विश्लेषण करून पहिली यादी गुरुवारी (दि. २७) प्रसिद्ध होत आहे. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दि.१ जुलैपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

दुसरी नियमित फेरी ३ जुलैपासून

पहिली नियमित फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणखी दोन अशा एकूण तीन नियमित फेऱ्या राबविल्या जातील. यापैकी दुसरी फेरी दि. ३ ते १० जुलै या कालावधीत, तर तिसरी फेरी दि. ११ ते १९ जुलै या कालावधीत राबविली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT