नाशिक

नाशिक : चांदोरी नजीक धावत्या शिवशाहीला भीषण आग; सुदैवाने जीवित हानी टळली

backup backup

निफाड; पुढारी वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील चांदोरी जवळील शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रविवार (दि. 10) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला भीषण आग लागली. निफाड तालुक्यातील चांदोरी जवळील शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रविवार (दि. 10) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत बस मधील 25 प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर शिंपीटाकळी फाटा येथे ही दुर्घटना घडली. शिवशाही बस (क्र. एम एच ०९ एफ एल ०४७७) ही बस नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना आज (दि. 10) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास धावत्या बसमध्ये इंजिनच्या बाजूने धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. वाहकाने तत्काळ सदरची बस थांबवून सतर्कतेने बसमधील प्रवासी खाली उतरवले, त्यानंतर काही क्षणातच बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला व या आगीत ही संपूर्ण बस भक्षस्थानी पडली. या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ कोटमे, भाऊ कर्डिले किरण वाघ, सुरज पगारे, सचिन कांबळे, निलेश नाठे, गोकुळ टरले, घटनास्थळी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी यावेळी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

SCROLL FOR NEXT