सिन्नर : तालुक्यातील देशवंडी शिवारात वनविभागाच्या डोंगराला आग लागून सुारे अडीच हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाल्याची घटना घडली.
वनरक्षक संजय गिते यांच्यासह देशवंडी आणि मापारवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी सुारे 5 तास प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर रात्री 11 च्या सुमारास आग आटोक्यात आली. तालुक्यातील देशवंडी गावाच्या दक्षिण बाजूला डोंगर उताराला असलेल्या वनविभागाच्या क्षेत्राला शुक्रवारी (दि.31) संध्याकाळी 6 च्या सुारास अचानक आग लागली होती. ही बाब स्थानिक ग्रामस्थांनी वनरक्षक गिते यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी येत ग्रामस्थांना सोबत घेऊन आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, वनपाल सुजित बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गिते यांनी देशवंडी येथील राहुल बर्के, डोाडे, सांगळे, सानप त्याचबरोबर मापारवाडी येथील अमोल पवार, गोपाळ पवार, अमोल बर्डे, राकेश ठाकरे, रोशन जाधव यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, डोंगर शिवार हा निर्मनुष्य असून तिथे टवाळखोरांनी ही आग लावली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागल्यानंतर डोंगर उताराचा भाग असल्याने तेथे अग्निशामक बंबाचे वाहन येणे अशक्य होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी ओली बारदाने, झाडा - झुडपांच्या फांद्या हातात घेऊन तब्बल पाच तास शर्थीचे प्रयत्न करत ग्रामस्थांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या आगीची झळ आवळा, करंज, शिसव, कडूनिंब, जंगली बाभळी आणि इतर सुारे 1200 हून अधिक झाडांना बसली. त्यातील बहुतेक झाडे 6 वर्षांहून अधिक वयाची होती. मोठ्या झाडांना थोडीच झळ बसल्याने ती वाचण्याची शक्यता आहे. इतर झाडे मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली